33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय असं मला वाटलं : अजित पवार

कोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय असं मला वाटलं : अजित पवार

टीम लय भारी 

पुणे l कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. परंतु नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. आपल्या पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, एकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही. हे मनातून काढून टाका, पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचे पालन करावे तसेच आता करोना आजाराची दुसरी लाट येणार असे अनेक तज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, काही उमेदवार तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माझा आणि अन्य नेत्यांचा फोटो लावून प्रचार करीत आहे. त्यावर विशेष लक्ष ठेवा, आपल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करा, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी