27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थांसाठी 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय घेतला!

ठाकरे सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थांसाठी ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय घेतला!

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार आहेत. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.

राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवले. खरतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार

 पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही. राज्यातील जे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय

कोरोना काळात ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरु होते. पण आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थी जे RTE अंतर्गत त्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तर ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

१० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार

नव्या वेळापत्रकानुसार १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे, तर १२  वीची लेखी परीक्षा २३  एप्रिल ते २१  मे रोजी होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण बोर्डाने सांगितले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी