29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांचं खासदारकी पद धोक्यात, शिवसेनेचा जल्लोष

नवनीत राणांचं खासदारकी पद धोक्यात, शिवसेनेचा जल्लोष

टीम लय भारी

मुंबई :- युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. नवनीत राणाचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे अमरावतीच्या राजकमल चौकात शिवसेनेचा जल्लोष सुरू झाला आहे (Navneet Rana caste certificate canceled by Mumbai High Court).

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा ((Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे नवनीत राणा ((Navneet Rana) यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे, असा टोला शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी लगावला. राणा यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. घटनेच्या चौकटीत हा फार मोठा गुन्हा आहे. यामुळे राणा यांना तुरुंगावासदेखील घडू शकतो. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.

मराठा आरक्षणाची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

केंद्राच्या अखेरच्या इशाऱ्याला ट्विटरने दिला सकारात्मक प्रतिसाद!

Maratha quota: Uddhav Thackeray meets Modi, requests him to lift 50% cap on reservation

नवनीत राणा या २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा ((Navneet Rana) यांना दोन लाखाचा दंड ठोटावला आहे. तसेच सदरचे खोटे जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड. सी. एम. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.

या प्रकरणात नवनीत राणा ((Navneet Rana) यांनी जात पडताळणी समितीसमोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी यचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती उच्च न्यायालयाकडूनही मान्य करण्यात आली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने नवनीत राणा ((Navneet Rana) यांना दिला होता. या प्रकरणी आज पुढील सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने नवनीत राणा ((Navneet Rana) याचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नवनीत राणा ((Navneet Rana) यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

राणा यांची खासदारकी रद्द होणार?

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा ((Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटे ठरले, तर संबंधित सदस्याचे पद रद्द होऊ शकते. परंतु आता नवनीत राणा ((Navneet Rana) यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी