28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयलोकांच्या जीवापेक्षा मोदींना प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का? नाना पटोले यांचा सवाल

लोकांच्या जीवापेक्षा मोदींना प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का? नाना पटोले यांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला होता परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. परंतु तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. मात्र लसींचा तुटवडा निर्माण होतो आहे. लसींच्या दोन डोसमधील अंतर देखील वाढवले आहे.

कोरोना महासाथीचे संकट हाताळण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार (Modi government) सपशेल अपयशी ठरल्याचे वारंवार उघड झाले आहे. लसीकरणाचे ही कोणतेच ठोस धोरण मोदी सरकारडे (Modi government) नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला असताना कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय १३ मे रोजी सरकारने घेतला. हा निर्णय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीवरून घेतल्याचे सांगितले गेले. परंतु अशी शिफारस केली नसल्याचा आणि त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नसल्याचा खुलासा त्या गटातील शास्त्रज्ञांनी केला आहे. मग हा निर्णय मोदी सरकारने (Modi government) कोणाच्या सांगण्यावरून आणि कशाच्या आधारावर घेतला याचा खुलासा झाला पाहिजे?, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

कोरोना लसीकरणावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका घ्यावी, श्रीमंत शाहू छत्रपतींचे वक्तव्य

Covid-19: Why are states assuming the third wave will impact mostly children?

ज्या शास्त्रज्ञांचा हवाला देत मोदी सरकारने लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते तो सरकारचा दावा धादांत खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन लसीमधील अंतर वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशिल्ड लसीबद्दलच का घेतला गेला? लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली आणि त्यामुळे मोदींची प्रतीमा मलीन होऊ नये म्हणून हा सारा खाटाटोप केला आहे का? लसीकरण मोहिमेत मोदी सरकारला (Modi government) आलेले अपयश झाकण्यासाठीच हा निर्णय घेतला नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत असून केंद्र सरकारने जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. मोदी सरकारच्या (Modi government) काळात मरण स्वस्त झाले आहे, असे म्हणत नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर (Modi government) निशाणा साधला.

सरकारकडे लसीचे राष्ट्रीय धोरण नाही

लसीमुळे कोरोनापासून होणारा धोका कमी होण्यास मदत होते हे अनेक तज्ञांनी सांगितले आहे. परंतु मोदी सरकारकडे (Modi government) लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींची आवश्यक मागणी लस उत्पादक कंपन्याकडे न करताच आधी ४५ वर्षांवरील आणि नंतर १८ वर्षावरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्य सरकारकडे लसींचा पुरवठाच योग्य त्या प्रमाणात केला गेला नाही. दोन कंपन्यांवरच विसंबून राहिल्याने लसीकरण मोहिम फसली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“घरोघरी जाऊन लस द्यावी असे उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनीही सर्वांना मोफत लस देण्यासंदर्भात मोदी सरकारला (Modi government) पत्र पाठवून सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्याकडे मोदींनी दुर्लक्ष केले, आतातरी त्यांचा सल्ला ऐकून लोकांच्या जीवीताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी