30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयकोरोना लसीकरणावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

कोरोना लसीकरणावरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला होता परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. परंतु तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. मात्र लसींचा तुटवडा निर्माण होतो आहे. लसीकरणावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे (Rahul Gandhi has criticized the central government over vaccination).

लसींची टंचाई जाणवत असल्याने लसीकरणाला (Vaccination) गती देण्यात अडथळे येत आहेत. लसींचा तुटवडा जाणवत असतानाच सरकारने महिन्याभरापूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेऊन घेण्यात आला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरुनच, काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे (Congress leader Rahul Gandhi has criticized the central government).

मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका घ्यावी, श्रीमंत शाहू छत्रपतींचे वक्तव्य

मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनात बड्या नेत्यांचा सहभाग

Covid-19: Why are states assuming the third wave will impact mostly children?

तज्ज्ञांच्या सल्लाने कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचे सरकारने सांगितले होते. पण, अशा प्रकारचा कोणताही सल्ला आपण केंद्राला दिला नसल्याचे पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ मे रोजी घेतला. त्यावेळी देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती आणि लसींचा साठा कमी होता. त्यावरुन, राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे (Rahul Gandhi has targeted the central government).

देशात तात्काळ लसीकरण (Vaccination) पूर्ण करायला हवे, मोदी सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेली लसींची कमतरता लपविण्यासाठी भाजपाकडून दररोजचा खोटेपणा आणि नारेबाजी कामाची नाही, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. तसेच, पंतप्रधानांची खोटी प्रतिमा सावरण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्नच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. त्यामुळेच, लोकांचा जीव जातोय, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवलं

नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) शिफारशीनुसार कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. ब्रिटनमध्ये करण्यात आलेले सर्वेक्षण आणि त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी यांच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले गेले. परंतु अशा  प्रकारची शिफारस करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे एनटीएजीआयच्या पॅनलमधील १४ पैकी ३ सदस्यांनी सांगितले आहे.

तज्ञ्ज्ञांनी अंतर वाढीचा दावा फेटाळला

‘जागतिक आरोग्य संघटनेने दोन डोसमधील अंतर ८ ते १२ आठवडे करण्याचा सल्ला दिला. एनटीएजीआयने या सल्ल्याची शिफारस केली. पण, दोन लसींमधला कालावधी १२ आठवड्यांहून अधिक असावा असे एनटीएजीआयने सुचवले नव्हते,’ अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी दिली. ‘आम्ही ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस केली होती. पण ते १२ ते १६ आठवड्यांचा निर्णय सरकारने घेतला. हा निर्णय योग्य असू शकतो किंवा मग तो अयोग्यदेखील असू शकतो. आमच्याकडे त्याबद्दलचा तपशील उपलब्ध नाही,’ असे गुप्ते यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी