27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रपुरामुळे कोकणातला मच्छिमार आर्थिक संकटात : सदाभाऊ खोत

पुरामुळे कोकणातला मच्छिमार आर्थिक संकटात : सदाभाऊ खोत

 

टीम लय भारी

मुंबई: रयत क्रांती संघटनाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी लय भारीच्या फेसबुक पेजद्वारे जनेतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातल्या पुरामुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांवर भाष्य केले (fisherman of konkan region suffering due to floods).

fisherman
सदाभाऊ खोत

कोकणात दोन चक्रीवादळ येऊन गेले. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छिमार करणारा कोळीबांधव आर्थिक संकटात आहे. परंतु सरकारने त्याच्याकडे लक्ष्य दिले नाही. कोकणातला कोळीबांधव हा कर्जबाजारी झालाय. तो आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर आहे ( fisherman facing economical issues )

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या अडाणीवर गुन्हा दाखल करा’

कोकणात झालेल्या दोन चक्रीवादळांमध्ये बोटींचे खूप नुकसान झाले. एका बोटीला लागणारा खर्च हा लाखोंच्या वर आहे. परंतु सरकार मात्र नुकसान भरपाई दहा हजार, पंधरा हजार रुपये देते. असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी सकारवर निशाणा साधला.

मच्छिमार संघटनेने बोटिंसाठी घेतलेले कर्ज किमान 100% माफ करावे. त्याचबरोबर किमान 50% अनुदान आणि 50% कर्ज देऊन कोळीबांधवांना आर्थिक सहाय्य करावे,अशी मागणी खोतांनी केली.

Video : ‘कोरोना’चे संकट, त्यात ‘झिका’चे सावट

Maharashtra Rains LIVE: CM Uddhav takes stock of flood-hit Chiplun; 150 NDRF teams deployed

आज कोकणातला मच्छिमार समुद्रात ईलेक्ट्रोनिक बोटी, एलईडी लाईट लावून मच्छिमार करतोय. परंतु या बोटी मंत्रिमंडळात बसलेल्या मंत्र्यांच्या आहेत असे सदाभाऊ खोत म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी