27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रमहाबळेश्वर - पाचगणीला पर्यटन सुरू होणार; मकरंद पाटील यांची घोषणा

महाबळेश्वर – पाचगणीला पर्यटन सुरू होणार; मकरंद पाटील यांची घोषणा

टीम लय भारी

पाचगणी : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नंदनवन पर्यटनाकरीता कोव्हीड-१९ या साथीच्या रोगामुळे बंद ठेवण्यात आल होते. पर्यटनावर गुजरान असणाऱ्या पाचगणी व महाबळेश्वर मधील घोडे व्यवसायिक, छोटे स्टॅालधारक, यांच्यासह हॅाटेल व्यवसायिक हवालदिल झाले होते (Tourism will start at Mahabaleshwar and Pachgani Announcement of Makrand Patil).

महाबळेश्वर तालुक्यांतील विविध संघटना, पक्षांनी पर्यटन पॉंईट सुरु करण्याकरिता जिल्हाधिकारी सातारा शेखरसिंह यांच्याकडे मागणी केली होती. महाबळेश्वर तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांनी पर्यटन सुरु करण्याकरिता कायम पाठपुरावा केला. महाबळेश्वर व पाचगणी येथील सर्व पर्यटन पॉंईट पर्यटकानकरिता खुले होणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथे हिरडा नाका येथे आयोजित महत्वपुर्ण बैठकीत केली.

Aaditya Thackeray : पर्यावरण जपत पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न: आदित्य ठाकरे

कहाणी आग्र्याच्या सुटकेत शिवरायांसाठी जीवाची बाजी लावलेल्या दोन शिलेदारांची

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर मुख्याधिकारी पल्लवी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाची अभियंता, तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद म्हणाले की, महाबळेश्वर तालुक्यांतील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा जीवनचरित्र हा पर्यटनावर अवलंबून आहे. कोव्हीड-१९ साथीच्यारोगामुळे महाराष्ट्रचे नंदनवन कोलमडून पडले आहे. पर्यटकांना कोव्हीड-१९ संसर्गजन्य रोगामध्ये खबरदारी घेत पर्यटकांनी पर्यटन पॉंईट सुरु करावे अशी महत्वपूर्ण घोषणा यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी केली (Such an important announcement was made by MLA Makrand Patil).

Tourism start Mahabaleshwar Pachgani Makrand Patil
महाबळेश्वर

गोष्ट ऐका शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीची !

Section 144 in force at tourist spots in Pune

दरम्यान महाबळेश्वर व पाचगणी येथील पर्यटक पुरक व्यवसाय कर्जाच्या बोज्याखाली अडकले आहेत. याबाबत देखील महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे अशी मागणी हॉकर्स, घोडा व्यवसायिक, टॅक्सी व्यवसायिक यांची आहे. जगावर कोसळलेले संकट पर्यटन स्थळातील सर्वसामान्य जनतेला पिचवुन गेले आहे. महाराष्ट्राचे नंदनवन पुन्हा पर्यटकांकरिता सुरु होणार असल्याची महत्वाची घोषणा पर्यटकांच्या वाढीने महाबळेश्वरला सुखकारक ठरेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी