27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रनगराध्यक्षांच्या उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न

नगराध्यक्षांच्या उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न

टीम लय भारी

बीड : शहरातील दीपमाळ येथे बुधवारी वृक्षारोपण पार पडले. या समारंभास बीड येथील नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे सुद्धा उपस्थित होते (tree planting was organized in the presence of Mayor Dr. Bharatbhushan Kshirsagar at Deepmal in Beed today).

गतवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील काही ठराविक युवक युवतींनी एकत्र येऊन YFF ची स्थापना केली होती. युथ फॉर फिचर बीड असे या संस्थेचे नाव आहे. यावर्षी वर्ष पूर्ण होण्याच्या दिवशी वर्षपूर्ती निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. त्याच बरोबर स्नेहसम्मेलनाचे आयोजन सुद्धा केले होते.

महाबळेश्वर – पाचगणीला पर्यटन सुरू होणार; मकरंद पाटील यांची घोषणा

IAS अधिकाऱ्याचे अविरत कार्य, ‘कोरोना’ काळात एकही दिवस रजा न घेता कार्यरत

tree planting नगराध्यक्षांच्या उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न

गेल्या वर्षभरात युथ फॉर फिचर बीड संस्थेने 3 हजार झाले लावली आहेत. ही झाडे मोठी होतील तेव्हा शहराच्या सौंदर्यात भर पडेल. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने याचे महत्त्व मोठे आहे. शहर हिरवे होईल त्याचबरोबर वातावरण थंड राहील व पर्यावरणाबाबत येथील नागरिक जागरूक होतील. पर्यावरणाविषयी जिव्हाळा वाढीस लागेल. त्यांच्या या कार्याप्रती त्यांना शुभेच्छा देत आम्ही देखील तुमच्या सोबत राहु असे यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले. याठिकाणी ग्रुपच्या अधिकृत टी-शर्ट(जर्सी) चे लॉचींग मान्यवरांच्या हस्ते झाले.

रोहित पवार सरसावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, बाळासाहेब थोरातांशी केली चर्चा

Climate change: Families in Wales urged to plant more trees

याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,वनअधिकारी अमोल सातपुते यांनी देखील मार्गदर्शन केले.यावेळी नगरसेवक शुभम धुत,दादासाहेब मुंडे,गोवींद पैलवान,अरुण पाटील,नितीन राठोड,मोहन परजने,ईश्वर धन्वे,फामजी पारीख विशाल मोरे,शुभम शेटे,यांच्यासह या ग्रुपचे सदस्य व आदि.उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी