27 C
Mumbai
Wednesday, September 25, 2024
Homeराजकीयसुडाने कारवाई करायला आमच्या हातात सीबीआय किंवा ईडी नाही - संजय राऊत

सुडाने कारवाई करायला आमच्या हातात सीबीआय किंवा ईडी नाही – संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावर न्यायालयाकडून त्यांना जामीन देण्यात आली होती.  याच प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता (Sanjay Raut had interacted with the media).

यावेळी एका पत्रकाराने राऊत यांना नारायण राणेंची अटक ही राजकीय सुडबुद्धीतून करण्यात आली होती का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘ सुडाने कारवाई करायला आमच्या हातात सीबीआय किंवा इडी नाही. ‘ अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या कारवाई यांना सुडाची कारवाई म्हणतात असे  राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा खारीचा वाटा, स्वहस्ते पुस्तके ग्रंथालयाला दान

एकनाथ शिंदेंनी वाहिली आनंद दिघेंना श्रद्धांजली

Sanjay Raut had interacted with the media
अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या कारवाया सुडाच्या

संजय राऊत पुढे म्हणाले की, राणेंवर केलेली कारवाई जर सुडाची कारवाई होती तर, ती न्यायालयात टिकलीच नसती. अजूनही देशाची न्यायव्यवस्था ही स्वतंत्रपणे न्याय दानाचे काम करत आहे असे राऊत म्हणाले.

सचिन तेंडूलकरला बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या होत्या कानपिचक्या

ombay HC dismisses plea seeking Sanjay Raut’s arrest, asks woman to approach ‘appropriate’ court

तसेच राऊत यांना अनिल परब यांच्या नारायण राणेंच्या बाबतीत व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केली आहे. अनिल परब यांनी व्हिडिओमध्ये नारायण राणेंचा उल्लेख केला नाही असे राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी