28.2 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रजावलीतील 14 गावांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजना द्या : शशिकांत शिंदे

जावलीतील 14 गावांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजना द्या : शशिकांत शिंदे

टीम लय भारी

पाचगणी : जावली तालुक्यात पर्जन्यमान जास्त होऊन देखील जावलीतील आई भगिनीच्या डोईवरील हंडा नेहमी डोक्यावरच राहीला. तांत्रिक चुकांमुळे फक्त वीज बील भरुन जावलीतील १४ ग्रामपंचायतींना नाहक भुर्दंड बसत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्याकरिता विधानपरीषद आमदार शशिकांत शिंदे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे १४ गावांच्या नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर कराव्या अशी मागणी केली (Shashikant Shinde Provide new tap water supply schemes for villages).

जावली तालुक्यांतील केळघर विभागातील राष्ट्रवादी कार क्रिकेट बाजीराव चौधरी, आतिश कदम, दिपक मोरे, आकाश कोढाळकर यांनी जावलीतील १४ गावांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आमदार शशिकांत शिंदे याच्याशी वाशी येथे चर्चा केली.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांवर टीका केल्याने एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील ठरताहेत धनगर समाजाचे खलनायक

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची लागणार वर्णी ?

आमदार शशिकांत शिंदे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मत्री यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सातारा मतदार संघातील जावली तालुक्यांतील करंजे प्रादेशिक योजनेतील गाढवली, वाळजवाडी, मामुर्डी, तळोशी, केळघर, बोडांरवाडी, केडांबे, वागदरे, डागरेघर, मोहाट, म्हाते खुर्द, गांजे, गवडी, म्हाते बुद्रुक, या गावाच्या पाणीपुरवठा योजना करंजे प्रादेशिक मधुन झाल्या आहेत. १४ ते १५ वर्षांपूर्वी योजना झाल्याने त्या सर्वा योजना नादुरुस्थ व बंद आहेत (Since the plan was made 14 to 15 years ago, all those plans are faulty and closed).

Shashikant Shinde Provide water supply schemes for villages
शशिकांत शिंदेंनी जावली नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यासाठी पुढाकार

 

39 वर्षे सोबत होतो, भरपूर मसाला आहे माझ्याकडे : राणेंनी केला गौप्यस्फोट

ED attaches assets worth Rs 5.73 crore of NCP leader Eknath Khadse

दुर्गम डोंगराळ जावळी तालुक्यांतील कष्टकरी जनतेला प्रादेशिक योजना बंद असल्यामुळे पाण्याच दुर्भीक्ष उत्तम पर्ज्यन्यमान असुन देखील सदैव भेडसावत. उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे जावलीतील १४ गावाना स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना अत्यंत गरजेची आहे. तरी जावलीतील १४ गावांना खास बाब म्हणुन जलजीवन मिशनच्या रेट्रोफिटींगच्या योजने अंतर्गत पाणीपुरवठा विभाग सचिव महाराष्ट्र राज्य यांना आपण योग्य आदेश द्यावेत असे मागणी पत्र आमदार शशिकांत शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील याच्याकडे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी