27 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयरासपाच्या अध्यक्षपदी महादेव जानकरांची पुन्हा नियुक्ती

रासपाच्या अध्यक्षपदी महादेव जानकरांची पुन्हा नियुक्ती

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून महादेव जानकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची पुनर्रचना करण्यात आली असता जानकरांनाच पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी कौल देण्यात आला आहे. जानकरांनी आजवर जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यांची धनगर समाजाचे नेते म्हणून ख्याती आहे (Mahadev Jankar re-appointed as RSP president).

गेल्या सतरा वर्षांमध्ये जानकरांनी रासपा पक्षाची ओळख राज्य स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर निर्माण केली आहे. त्यांनी नेहमीच गरिबांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी दिलेला लढा समाज आजही विसरलेला नाही.

मनसेचा मनमानी कारभार

शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

Mahadev Jankar re-appointed as RSP president
जानकरांनी रासपा पक्षाची ओळख राज्य स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर निर्माण केली

स्व. गोपीनाथ मुंडे यांनी 2014 साली महादेव जानकरांना महायुतीमध्ये घेतले होते. त्यांनी पाच वर्ष मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. यानंतर जानकरांचे राजकारणातील नेतृत्व वाढत गेले. मुंडेंच्या निधनानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी जानकरांची मोठ्या भावाप्रमाने राजकीय पाठराखण केली होती.

तब्बल 23 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका

After Poll Debacle, BJP to Focus on Minority Vote Share to Strengthen Support in Bengal

येत्या नगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्रात त्यांचे अनेक दौरे गाजावाजा न करता झाले. त्यांनी नेहमीच प्रसारमाध्यमांकडून मिळणाऱ्या प्रसिद्धीपासून दूर राहत जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी