टीम लय भारी
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी एक वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणाऱ्या तुषार इंगळेला मदत केली होती. ऑस्ट्रेलियात अडकलेला असताना त्याची अडचण समजून घेऊन त्याला पुन्हा एकदा शिक्षणाची संधी देऊन नवे आयुष्य दिले (Dhananjay Munde was thanked by the youth abroad).
आज या गोष्टीला एक वर्षपूर्ण झाले आहे म्हणून तुषार इंगळे याने ट्ववीट करून धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. इंगळे म्हणाले परदेशात शिक्षण घेत असताना झालेल्या अडचणींपासून मुक्त करून, माझ्या गुणवतेचा विचार करून, माझी परिस्थिती समजून घेऊन मला परत एक जीवनदान दिले होते. त्यांच्या ह्याच विश्वासामुळे आज परदेशात निश्चित होऊन मी अभ्यास करीत आहे आणि यशस्वी रित्या पास होत आहे. म्हणून मी धनंजय मुंडेंचा आयुष्यभर ऋणी राहील.
धनंजय मुंडेंच्या निर्णयामुळे स्व. आर. आर. पाटलांची जागी झाली आठवण
माझ्यासारख्या अनेक विद्यार्थांना शिक्षणाची संधी देऊन त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम करीत आहात. तुमच्या या कार्यामुळे अनेक मुलांची स्वप्न पूर्ण होत आहेत. तुमच्या या कार्यासाठी धन्यवाद या शब्दांत तुषार इंगळे याने धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.
@dhananjay_munde pic.twitter.com/xW5v3Bu7Ka
— Tushar Ingle (@TusharI01105133) September 4, 2021
धनंजय मुंडे भावूक होऊन म्हणाले, माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय
धनंजय मुंडेंनी ट्ववीट केले की, तुषार आजाराशी लढत तू एक गुणवंत आणि अभ्यासू मुलगा आहेस हे तू सिद्ध केले आहेस. तसेच योग्य विद्यार्थांस संधी उपलब्ध करून देणे हे आमचे काम आहे. त्या संधीचे तू सोने केलेस आणि आम्हाला योग्य सिध्द केले आहे. तुझ्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशा शब्दांत मुंडेंनी तुषार इंगळेंना शुभेच्छा दिल्या आहेत (Munde has congratulated Tushar Ingle).
तुषार, आजाराशी लढत तू एक गुणवंत व अभ्यासू मुलगा आहेस हे तू सिद्ध केले आहेस ; योग्य विद्यार्थ्यास संधी उपलब्ध करून देणे हे आमचं कामच आहे. त्या संधीचं तू सोनं केलेस आणि आम्हाला योग्य सिद्ध केलेस…. तुझ्या उर्वरित अभ्यासक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!#ForeignScholarship https://t.co/d4bW2gKdFt
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 4, 2021