28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय‘आप' ने उपायुक्तांना घातला घेराव

‘आप’ ने उपायुक्तांना घातला घेराव

टीम लय भारी

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील भवानी अपार्टमेंट, सुर्वे कॉलनी येथे पावसाचे पाणी वाहून नेणारी गटार आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून या गटारीतून वारंवार मैलामिश्रित पाणी सोडले जाते. सोमवारी सकाळी असेच मैलामिश्रित पाणी सोडले असल्याचे स्थानिक नागरिकांनी दाखवून दिल्यानंतर ‘आप’चे युवाध्यक्ष उत्तम पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी तो मैला बाटलीत भरून महापालिकेत उपायुक्त निखिल मोरे यांनी घेराव घातला (Nikhil More, Deputy Commissioner of Municipal Corporation).

मैलामिश्रित पाणी सोडल्याबद्दल महापालिकेवर फौजदारी का नोंद करू नये अशी विचारणा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी उपायुक्त मोरे यांना केली. यावर मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून फोनवर माहिती घेतली. कावळा नाका येथून फेस्टिव्ह लॉन येथे येणारे सांडपाणी तुंबल्यास ते घाटगे-पाटील यांच्या बंगल्या समोरील चेंबरमार्गे सुर्वे कॉलनीत सोडले जाते अशी माहिती दिली. परंतु हे पाणी फक्त सांडपाणी नसून मैलामिश्रित आहे आणि ते पाणी पुढे जाऊन पंचगंगा नदीत मिसळते असे उत्तम पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

गोपीचंद पडळकरांची राज्यपालांकडे विनंती, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच बसवावा

संसर्ग होणारच नाही याची दक्षता घेण्याची गरज!

यावर मोरे यांनी संबंधित चेंबर साफ करून घेऊ असे सांगितले. फक्त चेंबर साफ करून उपयोग नाही, यावर कायमस्वरूपी उपाय काढा असे देसाई यांनी सुनावले. पुढील चार दिवसात जागेवर पाहणी करून उपाय काढला नाही, आणि जर पुन्हा मैलामिश्रित पाणी गटारीतून वाहले तर फौजदारी तर दाखल करूच, सोबत त्याच पाण्याने अधिकाऱ्यांना अंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देसाई यांनी दिला. संबंधित पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश उपायुक्त यांनी डॉ. पावरा यांना दिले (The Deputy Commissioner ordered to investigate and take further action).

कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज : डॉ. संजय ओक

Bhagwant Mann For Punjab Chief Minister? Supporters Say Will “Force” AAP

यावेळी सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मयूर भोसले, विशाल वठारे, प्रथमेश सूर्यवंशी, बसवराज हदीमनी, राकेश व्हटकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी