30 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमुंबईअविघ्न टॉवर आगीला जबाबदार कोण? फायर सिस्टम बंद, महापौर म्हणाल्या, सोसायटी मॅनेजमेंट,...

अविघ्न टॉवर आगीला जबाबदार कोण? फायर सिस्टम बंद, महापौर म्हणाल्या, सोसायटी मॅनेजमेंट, सिक्युरिटीवर कारवाई होणार

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. जीव वाचवताना एका रहिवाशाचा खाली पडून मृत्यू झाला. त्यानंतर, इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते आग प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली (Mumbai Mayor Kishori Pednekar angry).

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय सांगितलं?

अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारी याचा हात निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. तिथे ठिणगी उडून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतील रहिवासी सांगतात की त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किंगमध्ये ठेवली नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

…तेव्हा या कांचनगिरी होत्या कुठे?”; मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल

अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबींनी घेतली मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांची भेट

खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी 30 वर्षीय अरुण तिवारी इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी एका बाल्कनीतून दुसरीकडे जाण्याच्या नादात हात सुटून तो थेट खाली कोसळला. दुर्दैवाने जमिनीवर पडून त्याला प्राण गमवावे लागले.

नेमकं काय घडलं?

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर विसाव्या मजल्यापर्यंत पसरली. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

राज्यातील कोविड नियमांमध्ये शिथिलता, उपाहारगृहे आणि दुकाने यांच्या वेळा वाढविणार

1 dead in Mumbai highrise fire: What we know so far

19 व्या मजल्यावर आग, 20 व्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने काय सांगितलं?

अविघ्न पार्कमधील 19 व्या मजल्यावर आग आगली. मी रहायला 20 व्या मजल्यावर आहे. मला जसे आगीचे लोट दिसले, तसे मी लगोलग खाली उतरले. इतरांनाही आगीची माहिती दिली. आगीची भीषणता खूपच होती. माझ्या माहितीप्रमाणे 19 व्या मजल्यावर कुठेतरी फर्निचरचं काम सुरु होतं. त्यावेळी आग लागली. परंतु बिल्डिंगमध्ये ऑटोमॅटिक फायर सिस्टम आहे. रहिवासी इमारत असल्याने नागरिक अडकल्याची भीती आहे. परंतु रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पूर्ण झालेलं आहे. नागरिक अडकल्याची भीती राहिलेली नाही.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल काय म्हणाले?

अविघ्न इमारतीच्या 19 व्या आणि 20 व्या मजल्यावर आग जास्त पसरली. काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी