30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमहत्वाची बातमी : अहमद पटेल यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू, शरद...

महत्वाची बातमी : अहमद पटेल यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू, शरद पवार – ठाकरे यांच्यातील बैठक संपली

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने जोरदार हालचाली सुरू आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक नुकतीच संपली. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत दिल्लीत बैठक सुरू झाली आहे. दिल्लीतील बैठकीत शिवसेनेकडून अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर व अरविंद सावंत चर्चा करीत आहेत.

शिवसेनेला आज 7.30 वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याबाबत राज्यपालांनी निमंत्रित केले. त्यापूर्वीच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याची मानसिकता आहे. त्या दृष्टीने पुढील पावले टाकली जात आहेत. पण काँग्रेसचे दिल्लीतील नेते अंतिम निर्णयाप्रत अद्याप आलेले नाहीत. अहमद पटेल व शिवसेनेचे नेते यांच्यात चर्चा झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्यामार्फत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकेल असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

महत्वाची बातमी : उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात चर्चा

शिवसेनेला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची तयारी; कॉंग्रेसला सोबत घेऊन निर्णय घेणार

काँग्रेस, राष्ट्रवादीने मागे हटू नये, शिवसेनेसोबत एकत्र सरकार बनवावे : खासदार संजय राऊत यांचे आवाहन

भाजप शिवसेनेच्या पाठी फिरतेय, अन् शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीकडे भीक मागतेय : मनसेचा निशाणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी