27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजजाणून घ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतला एकूण खर्च आणि शिल्लक

जाणून घ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतला एकूण खर्च आणि शिल्लक

टीम लय भारी

मुंबई : वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी प्रामुख्याने वापरली जाणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 130 कोटी पैकी 99 कोटी रक्कम शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण निधीतल्या एकूण रकमेपैकी 31 कोटी खर्च करण्यात आली आहे. सदर माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे (CM Relief Fund : here is the total expenditure and balance).

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पासून आजमितीस 130 कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे.

Parambir singh: परमबीर सिंहांसह सचिन वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

आशिष शेलार, तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शेलारांना टोला!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( मुख्य निधी),  

  • नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( मुख्य निधी) दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून 99 कोटी रुपये शिल्लक आहे.
  • दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पासून 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 33 प्रकरणात अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अर्थसहाय्य जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे,’ असे अनिल गलगली यांचे मत आहे.

टोमॅटो शंभरीपार, शिवसेनेनं करुन दिली, बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ची आठवण!

Bailable warrant cancelled against Param Bir Singh, asked to deposit ₹15k in CM relief fund

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी