30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
HomeराजकीयParambir singh: परमबीर सिंहांसह सचिन वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

Parambir singh: परमबीर सिंहांसह सचिन वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

टीम लय भारी

मुंबई: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना गृहविभागाच्या महासंचालक पदावरुन निलंबित केल्यानंतर अडचणी वाढतच चालल्या आहेत(First chargesheet filed against Waze with Parambir Singh)

गोरेगाव येथील कथित खंडणी प्रकरणात परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासह एकूण ६ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परमबीर सिंह मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांचा या प्रकरणात जबाब नोंदवण्यात आला होता.

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

राज ठाकरे महाराष्ट्र दौ-यावर,जाणून घ्या सविस्तर कार्यक्रम

१ हजार ८९५ पानांच दोषारोपपत्र किला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांच्यावर एकूण ५ गुन्हे दाखल आहेत त्यातील ३ खंडणीचे गुन्हे तर एक अॅट्रॉसिटी आणि अधिकाऱ्यांना धमकावले असल्याचा गुन्हा आहे.

गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ५ आरोपींपैकी परमबीर सिंह, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू हे आरोपी आहेत.

मेस्मा लावण्याऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा;फडणवीसांचा सरकारला सल्ला!

Antilia blasts case: Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh suspended 

तर सचिन वाझे, परमबीर सिंह, अल्पेश आणि चिंटू यांच्याविरोधात या प्रकरणातील पहिलं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १ हजार ८९५ पानांच दोषारोपपत्र जबाबासहित किला कोर्टात दाखल करण्यात आले आहे.

 परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निलंबित केल्यानंतर त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी खंडणी गोळा करण्याचा आदेश दिला असल्याचा आरोप केला होता. यानंतर परमबीर सिंह फरार होते. सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात मुंबई पोलिसांकडून धोका असल्याचे सांगितले होते.

न्यायालयाने त्यांना ६ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तब्बल २३१ दिवसानंतर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. या नंतर त्यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणात जबाब नोंदवला आहे. अखेर परमबीर सिंह आणि पोलीस कोठडीत असलेल्या सचिन वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केले आहे.

परमबीर सिंह निलंबित

माजी मुंबई पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने परमबीर सिंह आणि पराग मणेरे यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत.

महाराष्ट्र सरकारने मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती समितीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील विभागीय चौकशीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली. परमबीर सिंह निलंबनाचा आदेश शुक्रवार ३ डिसेंबर रोजी स्वीकारला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी