30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरे यांना 'कोरोना'ची लागण, विधानसभा भंग करणार नाही

उद्धव ठाकरे यांना ‘कोरोना’ची लागण, विधानसभा भंग करणार नाही

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकार अंतिम घटका मोजत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते कमनलाथ यांनी या माहितीची पुष्टी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत दुपारी मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे हे मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त होईल’ असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज आहेत. सरकार बरखास्तीचा कोणताही निर्णय होणार नाही. आम्ही नेटाने सरकार चालवू, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

पैसा आणि सत्ता याच्या जोरावर केंद्रातील भाजप सरकार विविध राज्यातील सरकारे बरखास्त करीत आहे. ही ताकद व पैसा त्यांनी देश वाचविण्यासाठी करायला हवा. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीची अग्निपंखसारख्या योजना आणाव्या लागत असल्याचे नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा :

‘मविआ’च्या अपयशाला ‘कोरोना‘चा उतारा

एकनाथ शिंदेंसह पळपुट्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी केली प्रतारणाkआनंद दिघे, एकनाथ शिंदे नंतर ठाण्याची धूरा कोणाकडे ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी