29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयसरकार स्थापनेबद्दल भाजप – शिवसेनेला विचारा : शरद पवार

सरकार स्थापनेबद्दल भाजप – शिवसेनेला विचारा : शरद पवार

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे सरकार स्थापन होईल अशी चर्चा सुरू आहे. पण ‘सरकार स्थापनेबाबत भाजप व शिवसेनेला विचारा’, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. पवार यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संसदेच्या अधिवेशनासाठी पवार आज नवी दिल्लीमध्ये आले आहेत. यावेळी पत्रकारांनी पवारांना सरकार स्थापनेबाबत विचारले. त्यावर ‘भाजप व शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविली आहे. तुम्ही त्यांनाच विचारा. राष्ट्रवादी व काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. आमचा रस्ता वेगळा आहे.’ असे आश्चर्यकारक उत्तर पवार यांनी दिले. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अंतिम फैसला अद्याप झालेलाच नाही की काय अशी चर्चा आता या विधानामुळे सुरू झाली आहे.

सोनिया गांधी – शरद पवार यांच्यात आज बैठक

सरकार स्थापनेबाबत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बोलणी चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने अंतिम फैसला होईल असे वाटत होते. पण पवार यांच्या ताज्या विधानामुळे या बैठकीतील संभाव्य चर्चेविषयी सुद्धा उलट सुलट अंदाज वर्तविले जात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी