28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश राणे यांनी गरळ ओकली, आदित्य ठाकरेंवर टीका करण्यासाठी खालची पातळी गाठली...

निलेश राणे यांनी गरळ ओकली, आदित्य ठाकरेंवर टीका करण्यासाठी खालची पातळी गाठली !

टीम लय भारी 

 मुंबई:  गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. या निकालानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, आजचे निकाल बघितल्यानंतर आदित्यच्या बॉयफ्रेंडने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झालेले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.

भाजप नेते आमदार निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यामातून असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती जास्त काळ टिकणार नाही. राणे कुटुंबाकडून शिवेसना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. टीका करताना निलेश राणे यांचा तोल काहीसा ढासळला आहे.

या आधीही आमदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खालच्या पातळीवरची टीका केली आहे. निलेश राणेंनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता निलेश राणेंच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. हे ट्विटर युद्ध आता अधीकच रंगणार आहे. यामुळे पुंन्हा एकदा ठाकरे आणि राणे वाद चव्हाट्यावर दिसून येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी