31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकांदिवली येथील सेप्टिक टँकमध्ये पडून ३ सफाई कामगारांचा मृत्यू

कांदिवली येथील सेप्टिक टँकमध्ये पडून ३ सफाई कामगारांचा मृत्यू

टीम लय भारी 

मुंबई : कांदिवली येथील सार्वजनिक शौचालयाची सेप्टिक टँक साफ करताना 3 सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.सय्यद रौफ (३५), गणपती वीरस्वामी (४५), अन्नादुराई वेलमिल(४०) या दुर्घटनेत या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघे चिता कँम्पमधील झोपडपट्टीत राहाणारे सफाई कामगार होते. सदर सार्वजनिक शौचालय एक कंत्राटदार चालवत होता. द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट एज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँण्ड देअर रिहॅबिलीटेशन एक्ट, २०१३ या कायद्यानुसार मानवी विष्ठा साफ करणं, वाहून नेणं इत्यादी बाबींसाठी मानवी श्रमांचा उपयोग करणं बेकायदेशीर आहे.

सेप्टिक टँक साफ करण्यासाठी यांत्रिक वाहनं मुंबई महापालिकेकडे आहेत. मात्र खाजगी कंत्राटदार या कामासाठी बेकायदेशीरपणे मजूरांचा वापर करतात. या कंत्राटदारांरांना जेलमध्ये टाकावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. मात्र याबाबत पोलीस, पालिका प्रशासन कोणतेही कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे गरीब मजूरांचं शोषण, अवहेलना होतेच परंतु त्यांना जीवही गमवावे लागतात. कांदिवली येथे घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा सफाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येरणीवर आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी