27 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeराजकीयजयपूरमध्ये ‘द्रौपदी मुर्मू‘ यांची भव्य रॅली

जयपूरमध्ये ‘द्रौपदी मुर्मू‘ यांची भव्य रॅली

टीम लय भारी

जयपूर:राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू 12 जुलैरोजी जयपूरमध्ये रोड शो करणार आहेत.राष्ट्रपती पदासाठी आमदार, खासदार तसेच सर्व समाजातील नागरिकांनी समर्थन देण्यासाठी त्या रोड शो करणार आहेत. या रोडशोमध्ये जयपूर भाजप, एससी आणि एसटी महिला सहभागी होणार आहेत. मुर्मू यांच्या सोबत भाजपच्या नेत्यांची वाहन रॅली निघणार आहे. फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

या रॅली दरम्यान द्रौपदी मुर्मू यांचे आदिवासी आणि राजस्थानी संस्कृतीमधून स्वागत करण्यात येईल. 12 जुलैला द्रौपदी मुर्मू 3 वाजता सांगानेर विमानतळावर येतील. तेथून हाॅटेल क्लार्क आमेरपर्यंत रोड शो होईल. रस्त्यावर आदिवासी नृत्य करण्यात येईल. यावेळी लाडू वाटण्यात येतील. हाॅटेल क्लाक्र्स आमेरमध्ये आमदार खासदार, लोकप्रतिनिधी तसचे आदिवासी समाजातील नेते, निवृत्त नेते, डाॅक्टर, वकील यांच्या सोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.गुलाबचंद कटारिया, भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया, वसुंधरा राजे, राजेंद्र राठौड, केंद्रिय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, कैलाश चैधरी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

द्रौपदी मुर्मू 24 जूनला राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे रा. अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मुर्मू यांना पाठिंबा आहे. 18 जुलैला निवडणूक होणार आहे. तर 21 जूलैला निकाल लागेल. ‘सबका साथ, सबका विकास‘ हे पंतप्रधान मोदींचे ब्रिदवाक्य आहे. त्यानुसार समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, हे धोरण राबविण्यासा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मानस आहे.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : लहान मुलीला वानरांचा लळा!

अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !

अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी