28.3 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
HomeराजकीयVIDEO : आदित्य ठाकरे यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक; प्लास्टिक बंदी कडक करणार,...

VIDEO : आदित्य ठाकरे यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक; प्लास्टिक बंदी कडक करणार, पुनर्वापराबाबतही घेणार ठोस निर्णय

टीम लय भारी

मुंबई : पर्यावरण व पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे यांनी अनेक कल्पक उपक्रम आखले आहेत. मागील भाजप – शिवसेना सरकारमध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय आदित्य ठाकरे यांच्या सुचनेवरूनच घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर करणे, प्लास्टीक बंदी कडक करणे, प्लास्टिक मुक्तीच्या माध्यमातून खेड्यापासून शहरांपर्यंत परिसर स्वच्छ ठेवणे यासाठी ठोस धोरण आखण्यावर त्यांनी जोर दिला आहे. त्या अनुषंगाने आज महत्वाची बैठक आयोजित केली होती. प्लास्टिक उत्पादक कंपन्या व पर्यावरण विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे सुद्धा उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही प्लास्टीक उत्पादकांसोबत आज बैठक आयोजित केली होती. वेस्ट मॅनेजमेंटसंदर्भात आम्ही चर्चा केली. ग्रामीण आणि शहरी भाग साफ कसे ठेवू याबाबत आम्ही काही पाऊले उचलली आहेत. तीन वर्षांपूर्वी आपण प्लास्टिकवर बंदी आणली. त्या अनुषंगाने पुढे कसे जायचे यावर या बैठकीत चर्चा झाली. सगळेच प्लास्टिक वाईट नसते. पण बंदी घातलेले प्लास्टिक वगळून इतर प्लास्टीकचा पुनर्वापर कसा करता येईल यावर आम्ही पुढे चर्चा करणार आहोत. स्ट्रॉ, ताट, वाटी, चमचा अशा ज्या प्लास्टिकवर बंदी आहे तो कायदा आम्ही अजून कडक करणार आहोत, तर बाकीच्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात कसे करता येईल यावर लवकरच निर्णय घेणार आहोत, असे ते म्हणाले.

आपले घर, गाव, शहर स्वच्छ ठेवा. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र साफ होईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

VIDEO : आदित्य ठाकरे यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक; प्लास्टिक बंदी कडक करणार, पुनर्वापराबाबतही घेणार ठोस निर्णय
जाहिरात

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

आदित्य ठाकरेंचा आणखी एक कल्पक उपक्रम; यंदापासून महापालिकेमार्फत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी