27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाVirat Kohli : विराट कोहलीमध्ये धावा करण्याची भूक पूर्वीप्रमाणे वाढली - संजय...

Virat Kohli : विराट कोहलीमध्ये धावा करण्याची भूक पूर्वीप्रमाणे वाढली – संजय बांगर

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये कोहली फक्त 2 आणि 11 धावा करू शकला होता. परंतु तिसऱ्या व निर्णायक सामन्यामध्ये त्याने 48 चेंडूत 63 धावा करून भारतासाठी आणखी एक विजय मिळवून दिला. भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यामध्ये सलामीवीर के.एल. राहुल आणि रोहित शर्मा यांना लवकर गमावल्यानंतर कोहली आणि सूर्यकुमार यादवने सामना जिंकवून देणारी महत्त्वपूर्ण 104 धावांची भागीदारी केली.

भारताचा पूर्व कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने हैदराबादमध्ये 25 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या व निर्णायक टी-20 सामन्यामध्ये 63 धावांची महत्त्वपूर्ण करून भारतीय क्रिकेट संघाला तीन सामन्याच्या टी-20 मालिकेमध्ये विजय मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यावर भाष्य करताना भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की, रविवारी झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहलीची फंलदाजी बघून असे दिसून आले की, तो चांगल्या लयीमध्ये पुन्हा परतला आहे. आशिया कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोहलीने विश्रांती घेतली होती ती त्याच्या पथ्यावर पडली आहे. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी विराट कोहली हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मामध्ये होता. महाद्वीपीय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोहलीने चार T-20 सामन्यांमध्ये फक्त 81 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

आशिया कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोहलीने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेमध्ये विश्रांती घेऊन  स्पर्धात्मक खेळामधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आशिया चषक स्पर्धेसाठी कोहली पुन्हा जोमाने परतला आणि त्या स्पर्धेत भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आशिया चषक सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 66 चेंडूत नाबाद 122 धावा करून कोहलीने आपल्या टी-20 कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले.

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये कोहली फक्त 2 आणि 11 धावा करू शकला होता. परंतु तिसऱ्या व निर्णायक सामन्यामध्ये त्याने 48 चेंडूत 63 धावा करून भारतासाठी आणखी एक विजय मिळवून दिला. भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यामध्ये सलामीवीर के.एल. राहुल आणि रोहित शर्मा यांना लवकर गमावल्यानंतर कोहली आणि सूर्यकुमार यादवने सामना जिंकवून देणारी महत्त्वपूर्ण 104 धावांची भागीदारी केली.

विराट कोहलीच्या खेळाबदद्ल बोलताना बांगर म्हणाले की, तो एक चॅम्पियन फलंदाज आहे. त्याने भारतासाठी मोठ्या कालावधीसाठी अशा प्रकारची कामगिरी केली आहे. तो  त्याच्या  कारकीर्दीच्या अशा टप्प्यात आहे, जिथे तो त्याच्या खेळाचा खूप आनंद घेत आहे. त्याला माहित आहे की,  त्याची लय परत आली आहे,  भूक परत आली आहे.  एक काळ असा होता जेव्हा त्याच्यावर दबाव येत होता परंतु विश्रांती घेतल्यानंतर असे दिसून येत आहे की, त्याच्या खेळामध्ये  आनंदाची भावना परत आली आहे. ही भारतीय क्रिकेट रसिकांची खूप चांगली बातमी आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन म्हणाला की, विराट कोहलीने भारतीय संघासाठी क्रमांक तीनवर फलंदाजी करणे सुरू ठेवली पाहिजे. तो भारतीय फलंदाजीतील स्फोटक सलामी जोडी आणि सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या या मधल्या फळीतील खेळाडूंशी समन्वय साधून फंलदाजी करणारा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे.

हे सुद्धा वाचा –

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना दिलासा मिळणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Two NCP groups fight: सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बारामतीत दोन गट एकमेकांना भिडले

Dahiwadi News : युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी डाॅ. नितीन वाघमोडेंच्या खास टिप्स

उल्लेखनीय म्हणजे, आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये कोहलीने भारतीय डावाची सुरूवात करून शतकीय खेळी केल्यानंतर कर्णधार रोहितने शर्माने विराट कोहली विश्वचषकात भारतासाठी डावाची सुरुवात करू शकतो असे स्पष्ट संकेत दिले होते.

भारताच्या सलामी फलंदाजीच्या समीकरणावर भाष्य करताना हेडन म्हणाला की, मला असे वाटते की आपण याबद्दल बरीच चर्चा करत आहोत. माझ्यासाठी ही चर्चा न करण्यासारखी गोष्ट आहे. अनेक सामन्यांमध्ये के.एल. राहुल आणि रोहित शर्मा यांनी खरोखरच चांगली सलामी भागीदारी केली आहे याच कारणामुळे कोहली तिसऱ्या क्रमांकावर फंलदाजी करतो. सूर्यकुमार यादव आणि कोहली हे खूप चांगली फलंदाजी करत आहेत हे तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्यांना एकत्र फलंदाजी करण्यात खूप मजा येते. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्टीव्ह स्मिथची उणीव खूप जाणवली कारण तो तिसऱ्या क्रमांकावर खूप चांगली फंलदाजी करतो.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेतमध्ये विजय मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाची तीन टी-20 सामन्यांशी मालिका खेळणार आहे. त्याचा पहिला सामना 28 सप्टेंबरला त्रिवेंद्रम येथे खेळला जाणार आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी