29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeमुंबईMumbai : कुत्र्यांना खाऊ घालण्यासंदर्भातील निर्णयाविरोधात मुंबईत प्राणीमित्र संघटनेचे आंदोलन

Mumbai : कुत्र्यांना खाऊ घालण्यासंदर्भातील निर्णयाविरोधात मुंबईत प्राणीमित्र संघटनेचे आंदोलन

रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खासकरून कुत्र्यांना रस्त्यावर खाणे घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठाकडून बंदी घालण्यात आली आहे. जर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला घालायचे असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीने त्या कुत्र्यांना दत्तक घेतलेले हवे, तसेच त्यांना रस्त्यावर खायला न घालता घरी नेऊन खायला घालणे, असे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना महामारीमध्ये भटक्या प्राण्यांना खाण्यासाठी अन्न उपलब्ध न झाल्याने अनेक प्राणीमित्र संघटना बाहेर पडल्या आणि त्यांनी भटक्या प्राण्यांसाठी अन्न उपलब्ध करून दिले. त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटात देखील अनेक कुत्र्यांना, मांजरींना, भटक्या गायींना अन्न मिळत होते. पण आता रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खासकरून कुत्र्यांना रस्त्यावर खाणे घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठाकडून बंदी घालण्यात आली आहे. जर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला घालायचे असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीने त्या कुत्र्यांना दत्तक घेतलेले हवे, तसेच त्यांना रस्त्यावर खायला न घालता घरी नेऊन खायला घालणे, असे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय जरी नागपूरमधील भटक्या कुत्र्यांना लागू असला तरी नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात दादर येथील शिवाजी पार्क येथे 30 ऑक्टोबर रोजी प्राणीमित्र संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालण्यासंदर्भात दिलेल्या या निर्णयामुळे प्राणीमित्र संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच निर्णयाचा विरोध करण्यासाठी मुंबईतील प्राणीमित्र शिवाजी पार्क येथे रविवार, 30 ऑक्टोबर रोजी एकत्र जमणार आहेत. ‘चलो शिवाजी पार्क.. अभी नहीं तो कभी नहीं’ असे म्हणत सर्व प्राणीमित्र एकत्र जमणार आहेत.

Mumbai : कुत्र्यांना खाऊ घालण्यासंदर्भातील निर्णयाविरोधात मुंबईत प्राणीमित्र संघटनेचे आंदोलन

दरम्यान, भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालण्याच्या मुद्द्यावरून आजपर्यंत अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याबाबतचे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. ज्या भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालण्यात येते त्यांच्याकडून अनेकदा लोकांवर हल्ले सुद्धा करण्यात आले आहेत. याचमुळे याबाबतची याचिका 2006 साली नागपूरच्या धंतोली नागरिक मंडळाकडून सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai-Pune Express Way Accident : मुंबई पुणे महामार्गावर भिषण अपघात! धावत्या ट्रकने घेतला पेट

Best Movies 2022 : सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत ‘मेरे देश की धरती’

Bombay High Court : छठपूजेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचा भाजपला दणका

याच उलट रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांवर लोकांकडून अनेकदा करण्यात येणारा जाच हा अमानवीय असल्याचे मत प्राणिमित्रांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालण्यावरील बंदी तसेच नागपूर खंडपीठाने दिलेला हा निर्णय पूर्णतः चुकीचा असल्याचे मत प्राणिमित्रांनी व्यक्त केले आहे. परंतु आता नागपूर खंडपीठाने दिलेला हा निर्णय इतर ठिकाणी देखील लागू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

परिणामी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्राणिमित्रांनी आणि प्राणीमित्र संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याचसाठी येत्या 30 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत शांततेत आंदोलन करण्यात येणार आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आणि नागपूर खंडपीठाने दिलेला हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी अधिकाधिक प्राणिमित्रांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी मागणी प्राणीमित्र संघटनांकडून करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी