29 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरराजकीयBombay High Court : छठपूजेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचा भाजपला दणका

Bombay High Court : छठपूजेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचा भाजपला दणका

मुंबईत उत्तर भारतीय समाजाकडून छठपूजेच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून छठपूजेचे आयोजन सुद्धा करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर छठपूजेच्या कार्यक्रमाबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून भाजपला दणका देण्यात आला आहे.

मुंबईत उत्तर भारतीय समाजाकडून छठपूजेच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून छठपूजेचे आयोजन सुद्धा करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर छठपूजेच्या कार्यक्रमाबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून भाजपला दणका देण्यात आला आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात छठपूजेच्या आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. भाजपकडून घाटकोपर पूर्व येथील आचार्य अत्रे मैदानावर छठपूजेचे आयोजन करण्यात येणार होते. पण या मैदानात छठपूजेचा कार्यक्रम आयोजन करण्याची परवानगी आधीच नगरसेविका राखी जाधव यांनी मागितली होती. पण तरी देखील भाजपकडून याठिकाणी हा कार्यक्रम करण्यात येणार होता. पण अखेरीस नगरसेविका राखी जाधव यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

राखी जाधव यांनी केलेल्या आरोपानुसार बीएमसीने त्यांना आचार्य अत्रे मैदानात कार्यक्रम करण्याची आधी परवानगी दिली होती. पण भाजपच्या दबावानंतर त्यांना देण्यात आलेली परवानगी रद्द करून भाजप समर्थित अटक सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठानला परवानगी देण्यात आली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आज बीएमसीकडून राखी जाधव यांना देण्यात आलेली परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. आता मुंबईतील घाटकोपर भागातील आचार्य अत्रे मैदानावर 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी नगरसेविका राखी जाधव छठपूजेचे आयोजन करू शकणार आहेत.

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील आचार्य अत्रे मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दरवर्षी छठपूजेचे आयोजन करण्यात येते. यावेळीही राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनी या मैदानावर छठपूजेच्या आयोजनासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली. त्यांना ही परवानगीही मिळाली सुद्धा होती. मात्र त्यानंतर अटक सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठानने परवानगी मागितली होती. यानंतर बीएमसीने राष्ट्रवादीला परवानगी नाकारली.

यावेळी राखी जाधव यांनी आरोप केला की, बीएमसी कमिशनरवर भाजपकडून दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे बीएमसीने त्यांना आधी परवानगी देऊन नंतर ती परवानगी नाकारली. यानंतर राखी जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाजूने निकाल देताना बीएमसीची पूर्वीची परवानगी कायम ठेवली. म्हणजेच आता राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील आचार्य अत्रे मैदानावर छठपूजेचे आयोजन करू शकणार आहे.

हे सुद्धा वाचा

Ravi Rana-Bachhu kadu conflict : बच्चु कडू यांचा शिंदे, फडणवीसांना कोर्टात खेचण्याचा इशारा

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे बळीराजाच्या भेटीला

Ambadas Danve : अंबादास दानवे उद्या नाशिक, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार

यापूर्वी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभेसाठी ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता. शिवाजी पार्कमधील सभेसाठी सर्वप्रथम ठाकरे गटाने परवानगी मागितली होती. यानंतर शिंदे गटानेही शिवाजी पार्क येथेच सभा घेता यावी, यासाठी परवानगी मागितली होती. परंतु दोन गटांमधील संघर्ष वाढून कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, या कारणास्तव बीएमसीने परवानगी दिली नाही.

पण याचमुळे ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले. त्यावेळी देखील बीएमसीवर शिंदे-फडणवीस सरकारचा दबाव असल्याचा ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आला होता. परंतु त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर ठाकरे गटाला काही अटींच्या अधीन राहून शिवाजी पार्कवर सभा घेण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर शिंदे गटाने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आपला दसरा मेळावा आयोजित केला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!