29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यVIDEO : ‘कोरोना’च्या खबरदारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंचे बहुमोल ६ संदेश, प्रत्येकाने ऐकायलाच...

VIDEO : ‘कोरोना’च्या खबरदारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंचे बहुमोल ६ संदेश, प्रत्येकाने ऐकायलाच हवेत !

टीम लय भारी

मुंबई : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेमुळे अभिनेते असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हे घराघरांत पोहोचले आहेत. त्याचा ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी योग्य उपयोग आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करून घेतला आहे. टोपे यांच्या विनंतीवरून डॉ. कोल्हे यांनी सहा व्हिडीओ तयार करण्यासाठी मदत केली आहे. ‘कोरोना’ची खबरदारी कशी घ्यावी याबाबत व्हिडीओंमध्ये बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘करोना’ संदेश, भाग – १

डॉ. कोल्हे हे घराघरांत पोचलेले अभिनेते आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. महत्वाचे म्हणजे ते स्वत: डॉक्टर आहेत. ही बाब लक्षात घेऊन राजेश टोपे यांनी डॉ. कोल्हे यांना संपर्क साधला. ‘कोरोना’बद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. सोशल मीडियामध्ये चुकीचे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये योग्य संदेश जाणे गरजेचे आहे. तुमच्या लोकप्रियतेचा उपयोग त्यासाठी करता येईल, अशी विनंती टोपे यांनी डॉ. कोल्हेंना केली. त्यावर डॉ. कोल्हे लगेचच तयार झाले.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘करोना’ संदेश, भाग – २

‘राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागा’मार्फत संदेशाचे स्वरूप तयार करण्यात आले. त्यानंतर चित्रीकरणासाठी दोन दिवसांपूर्वी विभागाने डॉ. कोल्हे यांच्याकडे टीम पाठविली. या टीमच्या सोबतीने तब्बल तीन ते चार तास वेळ देऊन डॉ. कोल्हे यांनी संदेश चित्रीत केले. त्यासाठी त्यांनी कसलाही मोबदला घेतला नाही हे विशेष.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘करोना’ संदेश, भाग – ३

या संदेशांमध्ये मी डॉक्टर आहे असे कोल्हे नमूद करत आहेत. निरोगी लोकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. हात वारंवार धुण्याची आवश्यकता आहे. गर्दी टाळा. असे विविध प्रकारचे मार्गदर्शन डॉ. कोल्हे यांनी केले आहे. डॉ. कोल्हे यांनी केलेल्या या व्हिडीओंमध्ये आरोग्य विभागाने चित्रांचीही जोड दिली आहे. त्यामुळे हे व्हिडीओ संदेश अधिक परिणामकारक झाले आहेत. ‘कोरोना’ची खबरदारी कशी घ्यावी हे लोकांनाही अतिशय सोप्या पद्धतीने या व्हिडीओमधून समजावून सांगण्यात आले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘करोना’ संदेश, भाग – ४

डॉ. कोल्हे यांचे सहा पैकी पाच व्हिडीओ ‘लय भारी’कडे उपलब्ध झाले आहेत. ‘लय भारी’च्या यू ट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ प्रसारित करण्यात आले आहेत.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘करोना’ संदेश, भाग – ५

‘आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या विनंतीनुसार डॉ. कोल्हे यांनी हे व्हिडीओ तयार करण्यास आम्हाला सहकार्य केले. ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी या व्हिडीओंचा चांगला फायदा होईल. हे व्हिडीओ आम्ही फेसबुक, ट्विटर, वॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणार आहोत. दुरचित्रवाणीवरूनही ते प्रसारित केले जाणार आहेत’ असे राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागा’चे उप संचालक कैलास बाविस्कर यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

ताज्या अपडेटस् मिळविण्यासाठी आमचे ट्विट्वर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

अजितदादांचा निर्णय : ‘करोना’साठी होऊ दे खर्च !

Breaking : ‘करोना’मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुटी, जीआर जारी

‘करोना’बाबतच्या खोट्या मेसेजमुळे सरकारपुढे डोकेदुखी

Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी