30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रCoronaVirus : आता तुरुंगानाही 'लॉकडाऊन'चे कवच !

CoronaVirus : आता तुरुंगानाही ‘लॉकडाऊन’चे कवच !

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाचा ( CoronaVirus ) सर्वत्र धुमाकूळ सुरु आहे. कोरोनाचा ( CoronaVirus ) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असल्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कारागृहात कोरोना ( CoronaVirus ) व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करोनाबाधीत क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात येत आहेत. संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात यावी. मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोननंबर दिले जाणार…

कोरोनाच्या ( CoronaVirus ) पार्श्वभूमीवर सर्वच अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण वाटली तर त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधता येईल. सर्व संबंधित कारागृहांना तातडीने याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचा-यांची अडचण दूर होईल.

हे सुद्धा वाचा

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

Jayant Patil : इस्लामपूरचे १४ रुग्ण कोरोना मुक्त, ‘सांगली’चा नवा पॅटर्न

Covid19 : ‘नरेंद्र मोदींनी डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी याबाबत देशाला संबोधित करावे’

नाटकाच्या दृश्याचा व्हिडीओ मारामारी म्हणून होतोय व्हायरल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी