28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजLockdown4 : ‘लॉकडाऊन’ 31 मेपर्यंत वाढणार

Lockdown4 : ‘लॉकडाऊन’ 31 मेपर्यंत वाढणार

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’चा तिसरा टप्पा येत्या १७ मे रोजी संपत आहे. पण ३१ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ ( Lockdown4 ) वाढविण्याबाबतची चर्चा मंत्री गटाच्या बैठकीत झाली आहे. ही बैठक गुरूवारी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

‘लॉकडाऊन’चा ( Lockdown4 ) चौथा टप्पा हा वेगळा असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून चौथ्या टप्प्याचे ( Lockdown4 ) आदेश जारी झाल्यानंतरच राज्यातील ‘लॉकडाऊन’चेही स्वरूप निश्चित केले जाणार आहे.

Lockdown4

‘लॉकडाऊन’चे ( Lockdown4 ) स्वरूप कसे असावे याबाबत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून सुचना मागविल्या होत्या. या सुचनांचीही दखल चौथ्या टप्प्यात ( Lockdown4 ) घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), पुणे महानगर क्षेत्र (पीएमआर) व नाशिक या परिसरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिथे निर्बंध आणखी कडक करावेत. पण या क्षेत्रातही अतिप्रभावीत भाग वगळून काही ठिकाणी व्यवसाय, दुकानांना परवानगी देण्याचा विचार अनेक मंत्र्यांनी या बैठकीत बोलून दाखविला.

मुद्रांक शुल्कांसारखे महसुली उपक्रम सुरू करण्याचाही विचार बैठकीत मांडण्यात आला. ‘लॉकडाऊन’मुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याचा मोठा फटका राज्याला बसला आहे. उत्पन्न नसल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे महसुलवाढीसाठी काही निर्णय घेण्याची गरज या बैठकीत बोलून दाखविण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमधील काही उद्योग व व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार ३० हजारपेक्षा जास्त व्यवसाय सुरू झाले आहेत. आणखी व्यवसाय सुरू व्हायला हवेत अशी भावना मंत्रिमंडळाची आहे. त्या अनुषंगाने चौथ्या टप्प्यात ( Lockdown4 ) निर्णय घेतले जातील असे या सूत्रांनी सांगितले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी ‘लय भारी’ ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

हे सुद्धा वाचा

‘लॉकडाऊन’मध्ये दारू विक्रीचा परिणाम, वेटरकडून तरूणाची हत्या !

Atmanirbhar Bharat : 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये मागासवर्गीयांना भोपळा : आमदार गजभिये

Atmanirbhar Bharat Abhiyan : लोकल ब्रँड ग्लोबल करण्यावर विशेष लक्ष्य, नागरिकांच्या खात्यात पैसे थेट जमा

Lockdown 4 Will Be Totally Different, Will Have To Live With COVID-19: PM Modi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी