27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमअभिनेता सलमान खान याला धमकी देणारा बालक पोलिसांच्या ताब्यात

अभिनेता सलमान खान याला धमकी देणारा बालक पोलिसांच्या ताब्यात

अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या एका व्यक्तीस मुंबई क्राइम ब्रांच ने ताब्यात घेतलं आहे. मात्र, हा व्यक्ती अल्पवयीन आल्याने त्याला पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

अभिनेता सलमान खान यांच्या बाबत काल मुंबई पोलिसांच्या मुख नियंत्रण कक्षात फोन आला होता.यावेळी मी सलमान खान ला 30 तारखेला मारहाण सांगा त्याला अस बोलून फोन ठेवून दिला होता.यानंतर मुख्य नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱयांनी आलेल्या फोन नंबर वर पुन्हा फोन करून कोण बोलतंय अस विचारना करण्यात आली असता समोरच्या व्यक्तीने मी रॉकी भाई बोलतोय.गोशाळा रक्षक , जोधपूर राजस्थान येथून बोलतोय, अस सांगितले.

सलमान खान याला धमक्या आल्याने मुंबई पोलीस सतर्क झालं. तपास मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आला.क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची अनेक पथक बनवण्यात आली.तपास सुरू झाला.यावेळी आलेल्या फोन ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दोलखांब या भागातून आल्याचं उघडकीस आलं.क्राइम ब्रांचच्या टीम त्या ठिकाणी पोहचल्या.यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना पाहून मोटारसायकल वरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

वनमंत्री मुनगंटीवार यांनी घडविला चमत्कार; महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० च्या पार !

पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरू केला चहाचा ब्रॅंड

मालवणीची ‘दगडफेक-दंगल’ पूर्व नियोजित; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

मात्र, पोलिसांनी त्याला गाठलाच. त्याच्या मोबाईल ची चौकशी केली असता त्याच्याच मोबाईल वरून धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आलं. मात्र, धमकी देणारा व्यक्ती अल्पवयीन आल्याने त्याच्या तात्काळ कारवाई करण्यात आली नाही. त्याला आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आता त्याला बाल न्यायालयात सादर करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी