27 C
Mumbai
Wednesday, June 19, 2024
Homeक्राईमएमएससीबी घोटाळा प्रकरणावर दाखल आरोपपत्रात अजित पवार यांच नाव नाही

एमएससीबी घोटाळा प्रकरणावर दाखल आरोपपत्रात अजित पवार यांच नाव नाही

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या बाबत गुन्हा दाखल झाला.हा गुन्हा ईडी ही तपास करत आहे.ईडीने अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.मात्र, या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच नाव नाही.याबाबात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.याबाबत हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार माता रमाबाई मार्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.हाच गुन्हा ईडीने तपास करण्यासाठी घेतला.ईडीने या प्रकरणात अनेक सहकारी साखर कारखाने जप्त केले आहेत. याच प्रकरणात सातारा येथील जारेंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे कर्ज आहे. तर अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष असताना 700 कोटी कर्ज देण्यात आलं होतं.

यानंतर कारखाना बुडीत निघाला. कारखाना 2010 सालात लिलावात काढण्यात आला.लिलावाची किंमत 65 कोटी ठरवण्यात आली होती. हा कारखाना स्पार्कलिंग सोईल या कंपनीने विकत घेतला. आणि पुन्हा जारेंडेश्वर सहकारी मिल प्रा ली या कंपनीला चालवायला दिला. मुख्य म्हणजे स्पार्कलिंग सोईल ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे. कारखान्याची विक्री संवश्या स्पद रित्या झाल्याने ईडीने तो जप्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

रोहितची बॅट तळपली; विराटला मागे टाकत IPL मध्ये केला नवा विक्रम

राजघराण्यातील समाध्यांच्या संवर्धनाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना भेटणार : छ. उदयनराजे भोसले

सुकन्या समृद्धी योजना: मुलीचे भविष्य होणार अधिकतम् सुरक्षित; जाणून घ्या कसे

आता ईडीने स्पार्कलिंग सोईल कंपनी आणि इतर कंपन्यांच्या विरोधात नुकतच आरोपपत्र दाखल केलं आहे.मात्र,या आरोप पत्रात कंपन्यांच्या संचालकांची नाव नाहीत.अजित पवार , सुनेत्रा पवार यांची ही नाव नाहीत.या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे ईडीने आज जरी त्यांची नाव आरोपपत्रात घेतली नसली तरी भविष्यात त्यांच्या विरोधात स्वतंत्र्य आरोपपत्र दाखल होऊ शकत , अस ईडीच्या सूत्रांच म्हणणं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी