27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमंत्रालयMahavikas Aghadi : राज्यातील 12 कोटी नागरिकांना 1000 आजारांवर मोफत उपचार, GR...

Mahavikas Aghadi : राज्यातील 12 कोटी नागरिकांना 1000 आजारांवर मोफत उपचार, GR जारी

टीम लय भारी

मुंबई : गरीब असो वा श्रीमंत, आजाराचे बिल 10 हजार असो वा 10 लाख… आता राज्यातील सर्व नागरिकांना मोफत उपचार करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. याबाबतच्या निर्णयाची बातमी ‘लय भारी’ने सर्वप्रथम दिली होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ( Mahavikas Aghadi ) राज्य सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे.

‘कोरोना’ व्हायरसच्या या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे या तिघांनीही हा निर्णय जारी करण्याचे मनावर घेतले होते. ‘कोरोना’ काळात खासगी रूग्णालये सामान्य लोकांची लूट करीत होते. त्या अनुषंगाने लोकांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’ची व्याप्ती वाढवून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी पिवळ्या व केशरी रेशनिंग कार्ड धारकाला या योजनेचा लाभ होत होता. परंतु आता पांढऱ्या रेशनिंग कार्ड धारकालाही योजनेचा लाभ मिळणार असल्याचे ( Mahavikas Aghadi ) आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लय भारी’ला सांगितले.

Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi

Mahavikas Aghadi

सरकारने ( Mahavikas Aghadi ) निश्चित केलेल्या राज्यातील 1000 रूग्णालयांमध्ये ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. कोविडसह जवळपास सगळ्या आजारांवर मोफत उपचाराची सुविधा सरकारने प्राप्त करून दिली आहे. सांधा रिप्लेसमेंटसारख्या काही महत्वाच्या आजारांचाही या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे

– राजेश टोपे, आरोग्य मंत्री

‘कोविड’च्या कालावधीपुरती ही योजना लागू केली असली तरी ती कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. या निर्णयामुळे ‘कोविड’च्या काळात कर्तव्यावर असलेले पोलीस, आरोग्य कर्मचारी व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना जर रूग्णालयात भरती व्हावे लागले तर त्यांच्यावरही मोफत उपचार केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हा जीआर स्पष्टपणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ही बातमी वाचलीच पाहीजेAjit Pawar …अन् अजितदादांनी ‘त्या’ फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत सही केली

ही बातमी वाचलीच पाहीजे : Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, जगात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला मिळणार ‘ही’ सुविधा

हे सुद्धा वाचा

Corona : ठाणे महानगरपालिकेत आणखी एक IAS अधिकारी

Politics : संजय राऊतांनी राज्यपालांना ‘का’ घातला ‘कोपरापासून’ दंडवत?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी