30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअभियंत्याला हसू आले, अन आमदार गीता जैन यांनी त्याचे गाल लाल केले....

अभियंत्याला हसू आले, अन आमदार गीता जैन यांनी त्याचे गाल लाल केले….

विकासकाला फायदा मिळवून देण्यासाठी एका झोपड्डीपट्टीच्या बांधकामावर मंगळवारी मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार गीता जैन यांनी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि सोनी यांना त्यांनी चांगलेच खडसावले. पण त्याचवेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हे हसत होते. त्यामुळे रागाने लाल झालेल्या जैन यांनी थेट पाटील यांच्या अंगावर जात त्याचा शर्ट खेचला आणि त्यांच्या कानाखाली मारली. या मारहाणीचा व्हिडिओ खूप वायरल झाला आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी या दोघांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पेणकर पाडा भागातील कक्कड इमारती जवळील अनधिकृत पककया बांधकामावर चार दिवसांपूर्वी कारवाई केली होती. त्याच ठिकाणी आज या दोन्ही अभियंता यांना आमदार गीता भरत जैन यांनी बोलावून घेतले आणि महापालिका सुरक्षा रक्षक, आमदारांचे सुरक्षा रक्षक, त्यांचे स्विय सहाय्यक तसेच इतर कार्यकर्ते यांच्यासमोर मारहाण केली. त्याचे शर्ट पकडून त्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओसुध्दा शहरात वायरल झाला आहे. या प्रकाराचा महापालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केला असुन, अशा प्रकारामुळे इतर कर्मचाऱ्यांचे मनोधर्याचे खच्चीकरण होते, त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होतो. अशा भावना अभियंत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

दर्शना पवार च्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम

भवानी देवीने रचला इतिहास, तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे ‘औरदंगाबाद’ आहेत, उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

दरम्यान, कायदा हातात घ्यायचा अधिकार आमदारांना नाही, त्या एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी समाजाला दिशा द्यायची असते, त्याच हिंसा करायला लागल्या तर कसे व्हायचे? अहिंसाच्या मार्गाने चालणाऱ्या आमदार हिंसा करताना पाहून आश्चर्य वाटले, त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक व्हावी. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी
मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी