27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रआशीष शर्मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाचे प्रधान सचिव

आशीष शर्मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाचे प्रधान सचिव

राज्यात गेल्या दीड महिन्यात 80 हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आज एमएमआरडीएचे अतिरिक्त मेट्रोपोलिटीन आयुक्त आशीष शर्मा (महाराष्ट्र केडर- 1997 ) यांची बदली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाचे प्रधान सचिव म्हणून झाली आहे. कोणतेही सरकार सत्तेत आल्यावर आपल्या विचारधारेचा, कार्यतत्परतेचा प्रभाव पाडेल असे सनदी अधिकारी जवळ बाळगतात. कॉँग्रेसच्या कार्यकाळात प्रवीण परदेशी यांना वन खात्यासारख्या अडगळीच्या खात्यात टाकण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आपल्याकडे ठेवून घेत प्रधान सचिव केले होते. याच परदेशी यांनी लातूरच्या भूकंपात खूप काम करत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा विश्वास संपादन केला होता. शिवाय या परिसरात ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांचे पुनर्वसन करून त्यांना नवे घरकुले दिली होती.

शिंदे सरकार आल्यापासून त्यांनीही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला आहे. 21 जुलै रोजी सरकारने तब्बल ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिथे जातील तिथली
व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची कायम बदली होत असते, यंदाच्या लॉटमधील बदलीत त्यांची बदली राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री असलेल्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याच्या सचिवपदी झाली आहे. कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान खात्याच्या आयुक्तपदावर असाताना तुकाराम मुंडे यांनी सरकारी रुग्णालयांची झाडाझडती घेत खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना थेट डिसमीस करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर काही दिवसांत तुकाराम मुंडे यांची बदली झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुंढे यांची यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय खात्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मात्र मुंढेंना आपल्या खात्यात घेण्यासाठी उत्सुक होते. त्यानंतर त्यांची बदली पशुसंवर्धन खात्याच्या मुख्य सचिवपदावर करण्यात आली होती. मात्र ते त्यावेळी ट्रेनिंगसाठी परदेशात होते. मुंढे यांनी या खात्याचा पदभार घेण्याआधीच त्यांची बदली मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली झाली. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मात्र तुकाराम मुंडे आपल्या खात्याच्या सचिवपदी असावे असे वाटत होते. अखेर 21 जुलै रोजी तुकाराम मुंडे यांची बदली मराठी भाषा विभागाच्या सचिव पदावरुन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय खात्याच्या सचिवपदी झाल्याने मंत्री विखे पाटलांना जो अधिकारी आपल्या खात्यात हवा होता तोच अधिकारी मिळाला आहे.
हे सुद्धा वाचा
तो निरोप अखेरचा ठरला!
वा रे गतिमान सरकार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या  5 लाखापर्यंत मदतीचा जीआर आलाच नाही!!
राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार
21 जुलै रोजी सरकारने 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्या पुढीलप्रमाणे-
राजेंद्र क्षिरसागर यांची मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिव पदावरुन आता मुंबई शहरचे जिल्हाधिकारीपदी बदली झाली होती. नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय चव्हाण यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती बुवनेश्वरी यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली झेडपीचे सीईओ कुमार आशीर्वाद यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर झेडपीचे सीईओ अभिनव गोयल यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला झेडपीचे सीईओ सौरभ कटियार यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी सह-सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. अंकित यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक मीनल करनवाल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी सह-सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सह-सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर मनीषा माणिकराव आव्हाळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी, अमरावतीचे सावन कुमार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनमोल सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुषी सिंह प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती. वैष्णवी बी., सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला येथे करण्यात आली आहे. श्रीमती पवनीत कौर जिल्हाधिकारी, अमरावती यांची संचालक, GSDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२३) गंगाथरण डी, जिल्हाधिकारी, नाशिक यांची बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल जगन्नाथ येडगे,  नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच संजय खंदारे, यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी