28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयइंडिया आघाडीचे अनेक नेते उपलब्ध नाहीत; मुंबईतली बैठक लांबणीवर पडली

इंडिया आघाडीचे अनेक नेते उपलब्ध नाहीत; मुंबईतली बैठक लांबणीवर पडली

शरद पवारांसह इंडिया आघाडीचे अनेक नेते ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात उपलब्ध नाहीत त्यामुळे मुंबईतली बैठक लांबणीवर पडली आहे. आधी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्टला ठरली होती, पण आता इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. काही नेत्यांनी आपण ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. या नेत्यांमध्ये शरद पवारांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली होती. कारण 16 ऑगस्ट रोजी शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी आपण मुंबईत उपलब्ध असू शकणार नाही, असं पवारांनी कळवल्याची माहिती समोर आली आहे.

26 पक्षांच्या विरोधी आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी सांगितले होते की, या बैठकीत ते आघाडीची समन्वय समिती, संयुक्त सचिवालय आणि इतर पॅनेलसाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत. इंडिया आघाडीची मुंबईतील बैठकीचे आयोजन शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत. याबैठकीत प्रचार, प्रसारमाध्यमे आणि आंदोलनासाठी इंडिया आघाडीकडून समित्या स्थापन करण्यात येतील.
 हे सुद्धा वाचा
आता राज्यात सर्व सरकारी रुग्णालयात मिळणार मोफत उपचार; मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईत वयोवृद्ध व्यक्तीची सुरक्षा वाऱ्यावर; बोरिवलीतील आढळला वृद्धेचा कुजलेला मृतदेह
अखेर ठाण्यातील क्लस्टर योजनेचे घोडे गंगेत न्हाले; ठाणे पालिका आणि महाप्रीतमध्ये निर्णायक करारावर स्वाक्षऱ्या

18 जुलै रोजी बेंगळुरूच्या बैठकीनंतर, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं होतं की, ‘मुंबईत 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली जाईल. प्रचार व्यवस्थापन आणि संयुक्त रॅली आणि कामकाजासाठी केंद्रीय सचिवालय देखील स्थापन केले जाईल. 11 सदस्यीय समन्वय समिती सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील. यांच्याद्वारे संवादाचे मुद्दे, संयुक्त रॅली, जागावाटप आणि विरोधी आघाडीच्या अशा इतर बाबींसह निवडणूक आणि राजकीय रणनीतीची भविष्यातील वाटचाल ठरवली जाईल. मुंबईच्या बैठकीत आघाडी अध्यक्षाची निवड करण्यात येईल, असंही खरगे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी