29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांनी साधला कर्तृत्ववान शेतकऱ्यांसोबत संवाद !

धनंजय मुंडे यांनी साधला कर्तृत्ववान शेतकऱ्यांसोबत संवाद !

राज्याचे कृषीमंत्रीपद स्विकारल्यानंतर धनंजय मुंडे सातत्याने शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत, विविध उपक्रम, योजना, शेताच्या बांधावर जावून भेटी देत आहेत. शेतकऱ्यांसाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुंडे सांगत असतात. मंगळवारी मुंडे यांनी राज्यातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात विविध पुरस्कार प्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला.

यवेळी शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करावी, शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावे, कृषी विभागाच्या रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण करावे, पुरस्काराच्या रकमेत वाढ करावी, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतीच्या कामांची संख्या वाढवावी, पिक विमा योजनेतील तालुका,जिल्हा व राज्यनिहाय तक्रार समित्यांवर शेतकऱ्यांची नियुक्ती करावी, शेतजमिनी मधील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे तो वाढवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात अशा विविध मागण्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केल्या.

हे सुद्धा वाचा 
इंडियाच्या बैठकीतून शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देश पातळीवर नेण्याचा प्रयत्न
उज्जैन येथे देशातील पहिले वैदिक घड्याळ होणार, भारतीय वेळ, लग्नाचा मुहूर्त, ग्रहणांची अचुक माहिती मिळणार
‘या’ राजकीय नेत्याने आपल्या दत्तक लेकरांविषयी व्यक्त केल्या भावना, तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल !

यावर मंत्री मुंडे यांनी कोविड व इतर कारणांमुळे रखडलेले पुरस्कारांचे वितरण लवकरच केले जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सर्व कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रतिनिधी यांची चारही विद्यापीठांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व कुलगुरू, कृषी आयुक्त यांच्या समवेत एक राज्यस्तरीय संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकाना दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी