33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयउज्जैन येथे देशातील पहिले वैदिक घड्याळ होणार, भारतीय वेळ, लग्नाचा मुहूर्त, ग्रहणांची...

उज्जैन येथे देशातील पहिले वैदिक घड्याळ होणार, भारतीय वेळ, लग्नाचा मुहूर्त, ग्रहणांची अचुक माहिती मिळणार

मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन शहरात देशातील पहिले वैदिक घड्याळ तयार होत आहे. सात मजली उंचीच्या वैदिक घड्याळाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यापर्यंत आले आहे. वैदिक खड्याचा मुख्य उद्देश त्यांना भारतीय वेळेची ओळख करून देण्याचा आहे. वैदिक घड्याळात भारतीय वेळ, लग्नाचा मुहूर्त, ग्रहण यांची माहिती मिळू शकते. उज्जैन हे कालगणनेचे केंद्रस्थान राहिलेले महाकालचे शहर म्हणून ओळखले जाते. उज्जैन येथील जिवाजी वेधशाळेत जगातील पहिले वैदिक घड्याळ तयार होत आहे. या वैदिक घड्याळ्यात जगभरातील विविध ठिकाणातील नोंदीतील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेशी जोडले जाईल.

वैयक्तिक घडाळ्यात सध्याच्या ग्रीनविच पद्धतीचे तास, मिनिटे आणि सेकंद असलेले घड्याळदेखील असेल. या घड्याळासाठी 1 कोटी 62 लाख रुपयांचा खर्च येईल. लखनऊ स्थित एका तज्ञाकडून वैयक्तिक घड्याळाची निर्मिती होत आहे. वैदिक घड्याळ वाचवण्यासाठी एप्लिकेशन तयार करण्याचाही विचार आहे. यामुळे नागरिकांना स्मार्टफोन, संगणक, टीव्ही याची माहिती मिळेल. वैदिक घड्याळ्यात ज्योतिर्लिंग, नवग्रहाची माहितीदेखील उपलब्ध केली जाईल.

जीवाजी अर्थात जंतर मंतर वेधशाळेत 82 फुट उंचीचा क्लॉक टॉवरवर 30 मुहुर्तांसोबत अचुक वेळ सांगणारी जगातील पहिले वैदिक घड्याळाची निर्मिती होत आहे. या कामाची सुरुवाती 6 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आली होती. मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. मोहन यादव यांनी या कामाचे भूमीपूजन केले होते. मंत्री यादव यांनी तीन महिन्यात या वैदिक घड्याळाचे काम पूर्ण होऊन गुडी पाडवा (22 मार्च 2023) रोजी घड्याळाची स्थापना होईल असे म्हटले होते. मात्र हे काम वेळेवर झाले नाही. दरम्यान या टॉवरचे काही काम अद्याप बाकी राहिले आहे.

मोबाईल, स्मार्टवॉचमध्ये डाऊनलोड करता येणार

वैदिक घड्याळ बनवून तयार झाली आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य हे की, या घड्याळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तासाला चित्र बदलणार आहे. एका वेळी व्दादश बारा ज्योतिर्लिंग, नवग्रह, राशीचक्र दाखविले जाणार आहेत. दर दुसऱ्यावेळी देशासह जगभरातील सुर्यास्त, सुर्यग्रहणांची चित्रे देखील दाखविली जाणार आहेत. या वैदिक घड्याळाचे अॅप देखील लॉन्च होणार असून लोक ते मोबाईल, स्मार्टवॉचमध्ये डाऊनलोड करु शकतील. यासाठी नासाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या अॅपमध्ये विक्रम पंचाग देखील असणार आहे. ज्यातून सुर्योदय, सुर्यास्ताची अचुक वेळ देखील भारतीयांना कळण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा 
‘या’ राजकीय नेत्याने आपल्या दत्तक लेकरांविषयी व्यक्त केल्या भावना, तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल !
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची रक्षाबंधन ठरणार आगळी -वेगळी!
रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची महिलांसाठी भेट; गॅस सिलिंडरच्या दरात घट

300 वर्षांपूर्वी जीवाजी वेधशाळेची स्थापना
जीवाजी वेधशाळेची स्थापना 300 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. महाराजा सवाई जयसिंह व्दितीय यांनी सन 1719 मध्ये या वेधशाळेची स्थापना केली होती. त्यानंतर दिल्ली, जयपूर, मथुरा आणि वाराणसी येथे वेधशाळांची निर्मिती करण्यात आली होती. सवाई जयसिंह यांनी अचुक वेळ मोजण्यासाठी सर्व वेधशाळांमध्ये सम्राट यंत्र, नाडी विलाय यंत्र, भित्ती यंत्र, दिगंश यंत्र तयार केले होते. उज्जैनमधून कर्कवृत्त जात असल्याने सवाई जयसिंग यांनी स्वतः येथे येऊन अभ्यास केला. त्यानंतर सुमारे २०० वर्षे उज्जैनची वेधशाळा दुर्लक्षित राहिली. 1923 मध्ये त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी