26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : कोरोना आकडेवारीत भारताने इटलीलाही मागे टाकले

Coronavirus : कोरोना आकडेवारीत भारताने इटलीलाही मागे टाकले

टीम लय भारी

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णसंख्येने (Coronavirus) आतापर्यंतचा सर्वोच्च एक दिवसाचा आकडा गाठला आहे. शुक्रवारी एकाच दिवसात ९८८७ रुग्ण समोर आल्याने एकूण रुग्णसंख्या २ लाख ३६ हजार ६५७ एवढी झाली आहे. सोबतच भारताने कोरोनाने सर्वाधिक कहर घातलेला देश इटलीलाही मागे टाकले आहे. (India also surpassed Italy)

दरम्यान, इटलीत ३३ हजार ७७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर भारतात ६६४९ मृत्यू झाले आहेत. भारतात अनलॉक १ सुरू झाले असतानाच असे आकडे समोर येण्यामुळे चिंता प्रचंड वाढली आहे.

कोरोनामुळे सर्वात प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिका वरच्या स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत १९ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिकेत एक लाख ११ हजार ३९० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १० लाख लोकसंख्येमागे ३३५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत साडे चार लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मातही केली आहे.

भारतात रुग्णवाढीचा वेग कायम

गेल्या काही दिवसात भारतात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. देशात प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे हा दर कमी आहे. इटलीशी तुलना केली तर इटलीत प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५५९ जणांचा मृत्यू झाला. तर इटलीत १ लाख ६४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना उद्रेकाचा वेग पाहिला तर येत्या काळात भारत युरोपियन देशांनाही मागे टाकण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि स्पेनला मागे टाकत भारत पुढील काही दिवसात सर्वात प्रभावित चौथा देश ठरू शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी