29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
HomeमुंबईCorona death : ठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू!

Corona death : ठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाचा करोनामुळे मृत्यू!

टीम लय भारी

ठाणे : मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेत्याचाही मंगळवारी करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

ठाणे जिल्ह्यातील कळवा विभागातील या नगरसेवकावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. १४ दिवसांपूर्वी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री त्यांचं निधन झालं. नगसेवक एका करोना रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. दोन दिवसांनी त्यांनाही करोनाची लक्षणं जाणवू लागली. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेत्याचाही मंगळवारी करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.  ५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मिरा भाईंदर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे नगरसेवकाची पत्नी आणि आईलाही करोनची लागण झाली आहे. या परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी