32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनशिवराय, आंबेडकरांबद्दल नागराज मंजुळेंचं मोठं वक्तव्य

शिवराय, आंबेडकरांबद्दल नागराज मंजुळेंचं मोठं वक्तव्य

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी ते नेहमीच चर्चेत असतात. सुरुवातीला फॅन्ड्री, सैराट, झुंड सारख्या सिनेमांनी नागराज मंजुळेंची लोकप्रियता अधिकच वाढली. सैराटने तर मराठी चित्रपट क्षेत्राची मान उंचावली. आंबेडकरवादी विचारांचा पगडा असणारे नागराज मंजुळे अधिकच चर्चेत होते. आता त्यांनी निर्माता म्हणून काम केलेला नवीन सिनेमा ‘नाळ 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ते चर्चेत आहेत.

दरम्यान, नागराज मंजुळेंना विचारलेल्या एका प्रश्नामुळे ते आधिकच प्रकाशझोतात आले आहेत. नागराज मंजुळे ‘लल्लनटॉप’ नावाच्या एका कार्यक्रमात गेले असता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आपले विचार मांडले आहेत. ‘लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन अ न्यूजरूम’ या कार्यक्रमात नागराज मंजुळे आले. त्यांनी पत्रकारांसोबत विचारांची देवाणघेवाण केली. यावेळी पत्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबाबत प्रश्न विचारला. यावर नागराज मंजुळे उत्तरले आहेत

हे ही वाचा

सुप्रिया सुळेंनी सुनील तटकरेंना सांगितली आईची माया !

फडणवीसांच्या प्रतिमेसाठी भाजपचा व्हिडीओ

‘ड्रग्ज पुरवठादार एकनाथ शिंदेंच्या जोडीला’

काय म्हणाले नागराज मंजुळे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबाबत नागराज मंजुळेंना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, ‘आदरापेक्षा प्रेम हे अधिक वरचढ असते’, मला वाटत नाही की, कोणत्याही व्यक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर, प्रेम नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे असे एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यावर सर्व जाती धर्माची लोकं प्रेम करतात. महाराज हे प्रत्येकासाठी त्यांच्या वडिलांसारखे आहेत. जसे की आपण ‘शिवबा’ अशी हाक मारतो, जसे की ज्योतीबा. असे नेते एखाद्या जातीपुरतेच मर्यादित नसतात. ते सर्वांचा विचार करत असतात.

छत्रपती शिवाजी महाराज माझे आजोबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे वडील.

‘छत्रपती शिवाजी महाराजांवर माझे प्रचंड प्रेम, आदर आहे. आणि मला ही गोष्ट कुणी शिकवायची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे वडील आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आजोबा आहेत’, असे वक्तव्य नागराज मंजुळेंनी केले होते. यामुळे ते आता अधिकाधिक चर्चेत आहेत. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची घोषणा नागराज मंजुळेंनी केली होती. यात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख देखील महाराजांच्या मुख्य भूमिकेत असणार आहे. याबाबत अजूनही पुढील कोणतीही माहिती समोर आली नाही. या चित्रपटाची त्याचे चाहते वाट पाहत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी