25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीय'ड्रग्ज पुरवठादार एकनाथ शिंदेंच्या जोडीला'

‘ड्रग्ज पुरवठादार एकनाथ शिंदेंच्या जोडीला’

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ड्रग्ज प्रकरणावर झापडं घातली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर अंमली पदार्थांचे सेवन करणारा ललित पाटील असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले. यावर आता ललित पाटीलचा आणि उद्धव ठाकरेंचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने ललित पाटीलला अटक केली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची तोंड बंद करण्यात येतील, असे वक्तव्य केले होते. यावर शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना धमक्या कसल्या देताय? असा सवाल केला आहे.

काही दिवसांपूर्वी ललित पाटील प्रकरणात राज्यातील राजकारणात राडा सुरू होता. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीकेचे आसुड सोडत होते. ललित पाटील पुण्यातील ससून रूग्णालयातून पळून गेल्याने महाविकास आघाडीने सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला तर काही दिवसातच पोलिसांनी पळून गेलेल्या ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. यावर फडणवीसांनी नाव न घेता महाविकास आघाडीवर संताप व्यक्त करत ‘सगळ्यांची तोंडं बंद होतील’, असे वक्तव्य केले असून यावर अंधारेंनी धमक्या देता का? असा सवाल केला आहे. ललित पवार अटक होऊनही काही दिवस झाले मात्र नेत्यांमधील ड्रग्जप्रकरणावरून वाद अजूनही मिटला नाही. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर एक ड्रग्ज आरोपी सापडला असल्याची माहिती अंधारेंनी दिली आहे.

सुषमा अंधारेंनी ट्वीट करत पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणावर प्रकाशझोत टाकला आहे. याआधी ललित पाटीलबाबत राजकीय नेते कडाडून उठले होते. ड्रग्ज तस्करीत सापडला असून एलविश यादव हा एकनाथ शिंदेंच्या बाजूला उभा असलेला वर्षा बंगल्यावरील फोटो आहे. या एलविश यादववर रेव्ह पार्टीत ड्रग्ज पुरवल्याचे गुन्हे दाखल आहेत, फोटोत एलविश मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवीची आरती का करत आहे? असा सुषमा अंधारेंनी सवाल केला आहे.

हे ही वाचा

अंतरवाली सराटीत काल काय घडलं?

डॉ. ओमप्रकाश शेटे आयुष्मान भारत अभियानाचे नवीन कक्ष प्रमुख

मराठा माणसाच्या मदतीला धावले मुस्लीम बांधव… काय झाले होते?

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्स शी संबंधित अनेक आरोप एलविश वर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी