28 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeटॉप न्यूजभूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ हादरले... भारतातही जाणवले हादरे!

भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ हादरले… भारतातही जाणवले हादरे!

पश्चिम नेपाळच्या पर्वतीय प्रदेशात शुक्रवारी मध्यरात्रीपूर्वी (3 नोव्हेंबर) 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली (Nepal Earthquake) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे किमान 129 लोक ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्यातील लामडांडा येथे 92 जणांचा मृत्यु झाला असून रुकुमा जिल्ह्यात 80 लोक ठार झाले आहेत. किमान 140 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्रानुसार, (National Earthquake Monitoring and Research Centre) जाजरकोट जिल्ह्यातील लामडांडा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू रात्री 11.47 वाजता नोंदवला गेला. काठमांडू आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आणि भारतातील नवी दिल्ली तसेच उत्तर भारतातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

देशातील जाजरकोट जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार भूकंपात किमान 129 जणांचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये गेल्या महिन्याभरातील हा तिसरा तीव्र भूकंपाचा धक्का होता. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा येथे होता. शुक्रवारी रात्री 11.47 वाजता झालेल्या भूकंपाचा प्रभाव काठमांडू आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आणि अगदी भारतातील नवी दिल्लीपर्यंत जाणवला. पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ शनिवारी सकाळी वैद्यकीय पथकासह घटनास्थळी रवाना झाले. नेपाळ आर्मी आणि नेपाळ पोलीस बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. भूकंपामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. दिल्ली – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. मदत आणि बाचावकार्य सुरू असून नेपाळचे पंतप्रधान पुष्प दहल प्रचंड यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

हे ही वाचा 

सुप्रिया सुळेंनी सुनील तटकरेंना सांगितली आईची माया !

फडणवीसांच्या प्रतिमेसाठी भाजपचा व्हिडीओ

‘ड्रग्ज पुरवठादार एकनाथ शिंदेंच्या जोडीला’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर दुःख व्यक्त करत ‘X’ वर एक पोस्ट टाकली आहे. ते म्हणाले, “नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल मनःपूर्वक दुःख आहे. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमचे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी आशा व्यक्त करतो.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी