29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र'माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका'; मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

‘माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका’; मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

राज्यात सकल मराठा समाजाकडून वारंवार मराठा आरक्षणाची मागणी सरकारकडे होत आहे. सरकार आरक्षण देणार असल्याचे केवळ आश्वासन देत आहे. मात्र ठोस पाऊल अजूनही उचललं गेलं नाही. मराठा समाजाला ओबीसी  (OBC) प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. मात्र ओबीसी समाजाने यासाठी नकार दिला आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ लागला आहे. मराठा बांधव आत्महत्या करत आहेत. सरकार आत्महत्या करू नका असे आवाहन करत असताना आत्महत्या सुरूच पाहायला मिळतात. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी नांदेड जिल्हा्यातील एका मुलीने आत्महत्या केली आहे. (Maratha reservation Suicide) तिने सुसाईड नोटही लिहीली.

एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आंदोलन, उपोषण करत आहे. जोरदार सभा देखील होत आहेत. मराठा आरक्षणाच्याविरोधात ओबीसी समाजाने देखील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याचे सांगितले होते. या आरक्षणाच्या वादात तरूण-तरूणी आत्महत्या करत आहेत. नांदेड जिल्हा्यातील इयत्ती नववीत शिकणाऱ्या कोमल तुकाराम बोकारे या मुलीने आपल्या सोमेश्वर गावातील राहत्या घरात गळ्याला गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही पाचवी आत्महत्या आहे. कोमलने आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहीली असून त्यात आई आण्णा माफ करा; माझे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असे लिहीले आहे.

कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना पाच मुली असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. अशा स्थितीत कोमलने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्या करताना तिने एक सुसाईड नोट लिहीली होती.

हे ही वाचा

‘धनगरांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा’; ‘यळकोट यळकोट, जय मल्हार…’

‘मनोज जरांगेंच्या मागून कोणी तरी बोलतंय’?

विराट कोहली इंस्टाग्राम पोस्टसाठी अक्षय कुमारहून घेतो अधिक पैसे?

काय लिहीले सुसाईड नोटमध्ये

मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील नववीच्या मुलीने आत्महत्या करत सुसाईड नोट लिहीली आहे. त्यात मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं आई आण्णा माफ करा; माझे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, तुमची कोमल.

Maratha reservation On 9th standard Girl Suicide

मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या

काही ठिकाणी आंदोलने केली जात आहे. तर काही ठिकाणी उपोषण केले जात आहे.  मराठा आरक्षणावरून मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ५ आत्महत्या झाल्या आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी