29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयशरद पवारांवर नाराज नाही, पण सुप्रिया सुळे नोकरासारख्या वागवतात

शरद पवारांवर नाराज नाही, पण सुप्रिया सुळे नोकरासारख्या वागवतात

शरद पवार गटातील युवकराष्ट्रवादी गटाचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी त्यांच्या साथीदारांसमवेत अजित पवारगटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यासंबंधी पत्रकार परिषदेतसविस्तर माहीती ही देण्यात आली. शरद पवारांनंतर त्या ताकदीचे नेतृत्व जर कुणातकार्यकर्त्यांना दिसत असेल तर ते अजित पवार आहेत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे प्रमुख, आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली(Not angry with sharad pawar but supriya sule treats like a slave). शरद पवार गटातील युवकराष्ट्रवादी गटाचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी त्यांच्या साथीदारांसमवेत अजित पवारगटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यासंबंधी पत्रकार परिषदेतसविस्तर माहीती ही देण्यात आली. शरद पवारांनंतर त्या ताकदीचे नेतृत्व जर कुणातकार्यकर्त्यांना दिसत असेल तर ते अजित पवार आहेत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्या सोबत असलेल्या सोनिया दुहानही लवकरच अजित पवार गटात प्रवेशकरतील अशी ही चर्चा आता होत आहे. शरद पवारांवर नाराज नसून नाव न घेता सुप्रियासुळेंवर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी वागण्याविषयी आक्षेप घेतला आहे. उपमुख्यमंत्रीतथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांनी बैठकीस संबोधित केले. निवडणूक हीकार्यकर्त्यांची परीक्षा असते. निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये तसचंपराभावाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपलं गेलेपाहिजे असं म्हणत अजितदादांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोधैर्यवाढवले. तसेच आता विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. त्यावर लक्ष्यकेंद्रीत करून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी