27 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
HomeमुंबईDrugs Matter : एनसीबी कंगनाची चौकशी का करत नाही : काँग्रेसचा सवाल

Drugs Matter : एनसीबी कंगनाची चौकशी का करत नाही : काँग्रेसचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रागिणी ही कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक होती. तर आदित्य अल्वा हा गुजरात भाजपचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेहुणा आहे. विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीप सिंहबरोबर सहनिर्माता आहे. पंतप्रधान मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करीत असताना याच वेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला १२०० किलो गांजासह अटक करण्यात आली याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. तसेच आपण ड्रग्ज घेत होतो, अशी कबुली देणा-या अभिनेत्री कंगना रनौतला (Drugs Matter) चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. यंत्रणा कंगनावर इतकी मेहरबान का? असे प्रश्न काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले. तसेच तिच्या चौकशीची मागणी केली.

व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणाच्या आधारे बॉलिवूडमधील काहींना केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपण ड्रग्ज घेत होतो, अशी कबुली देणा-या अभिनेत्री कंगना रनौतला चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. कंगनाचा ड्रग घेतल्यासंदर्भातील व्हिडीओ हा पुरावा आहे, असे असताना तिची चौकशी का केली जात नाही? यंत्रणा कंगनावर इतकी मेहरबान का? असे प्रश्न काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले. तसेच तिच्या चौकशीची मागणी केली.

भाजपचे बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे एनसीबीला दुर्लक्ष करू देणार नाही. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करीत असताना याच वेळी कर्नाटकमध्ये भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला १२०० किलो गांजासह अटक करण्यात आली याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. कर्नाटकात अभिनेत्री रागिनी द्विवेदीला सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली. अभिनेत्री रागिनी ही कर्नाटक भाजपची स्टार प्रचारक होती. याच प्रकरणात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आदित्य अल्वा या व्यक्तीलाही अटक केली. अल्वा हा गुजरात भाजपचा स्टार प्रचारक अभिनेता विवेक ओबेरॉयचा सख्खा मेहुणा आहे. विवेक ओबेरॉय हा मोदी बायोपिकचा निर्माता संदीप सिंहबरोबर सहनिर्माता आहे. पंतप्रधान मोदींची मुख्य भूमिकाही विवेकनेच साकारली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी