31 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयटेलिप्रॉम्टर अचानक बंद पडल्याने पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ

टेलिप्रॉम्टर अचानक बंद पडल्याने पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ

टीम लय भारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत हे गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण असल्याचे सांगून जगभरातील गुंतवणूकदारांना देशात येण्याचे आवाहन केले. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणापेक्षाही त्यांच्या मध्येच थांबल्याच्या क्लिपची चर्चा होत आहे.( P M Modi’s confusion over sudden closure of teleprompter)

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला आशेचा पुष्पगुच्छ दिला असल्याचं म्हटलं. तसंच भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे असं म्हणत त्यांनी गुंतवणुकदारांना आवाहनही केलं. दरम्यान, व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला.

भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असं मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले.त्यामुळे अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावं लागलं आणि त्यांचा काही क्षण गोंधळही उडाला.

हे सुद्धा वाचा

काँगेस नेते नाना पटोलेंना अटक करा, नितीन गडकरींची मागणी

आपल्यासाठी हा धोक्याचा इशारा; मोदींचे मुख्यमंत्र्यांना संकेत

Modi government : मोदी सरकारच्या काळात शेतक-यांचे ९५ हजार कोटींचे कर्ज माफ

Even teleprompter could not take so many lies: Rahul Gandhi after PM Modi’s Davos speech

या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन होऊ लागलीय.काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून शेअर करताना टीकाही केली आहे. त्यावरून टोला लगावताना सचिन सावंत यांनी म्हटलं की, ‘भारतीयांची प्रतिभा सोडा, मोदींची प्रतिभा बघा’ असं म्हणत सचिन सावंत यांनी ट्विटरवरून मोदींचा लाइव्ह भाषणात टेलिप्रॉम्पटर बंद पडल्यानं व्यत्यय आला तेव्हाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://twitter.com/ce06b01e22784b0/status/1483344666774814721?s=20

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी