26 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeराजकीयबारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांचा दिलखुलास रुप; कार्यकर्त्याच्या इच्छेखातर चहाच्या टपरीचे केले उद्घाटन

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांचा दिलखुलास रुप; कार्यकर्त्याच्या इच्छेखातर चहाच्या टपरीचे केले उद्घाटन

टीम लय भारी

मुंबई:- एका टपरी चालकाने माझ्या चहाच्या टपरीचे उद्घाटन करा अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे व्यक्त केली. ती इच्छा व्यक्त करताच अजितदादांनी त्या टपरी चालकाच्या इच्छेला मान दिला. फिरत्या वाहनावर चहा स्टॉल सुरु केला आहे याचे उद्घाटन आपण करावे अशी इच्छा आहे. अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखलवल्यावर अजितदादांनी उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला (Ajit Pawar heartfelt Baramati inauguration tea tapri)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा बारामती दौऱ्यावर असताना त्यांची अनेक रुपे बारामतीकरांना पाहायला मिळतात. अजितदादांचे असेच एक दिलखुलास रुप आज बारामतीत पहायला मिळाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले ट्रोल; या कारणामुळे नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय; अजितदादा पवार यांचा पारा चढला

रविवारी (ता.25) बारामती मध्ये विविध कामाचे उद्घाटन अजित पवार करत होते. त्यानंतर बारामती येथे महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटपून जात कार्यकर्त्यांच्या टपरीचे उद्घाटन करण्यासाठी अजितदादा टपरीवर पोहोचले आणि कार्यकर्त्याच्या इच्छेखातर चहाच्या टपरीचे उद्घाटन केले. त्यानंतर अजितदादांनी ‘तू बनवलेला चहा कसाय?, चहाला क्वालिटी हाय ना?, आण बरं चहा’ असे म्हणत चहाची चवही घेतली.

Ajit Pawar heartfelt Baramati inauguration tea tapri
उपमुख्यमंत्री अजित पवार

जागतिक कुस्ती स्पर्धा, भारताच्या प्रिया मलिकने पटकाले सुवर्ण पदक

Maharashtra lockdown likely to be eased further, hints Ajit Pawar; here’s what might change from next week

कोणताही प्रोटोकॉल न मानता प्रसंगी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन अजित दादांनी आपल्या कार्यकर्त्याच्या इच्छेखातर एका चहाच्या टपरीचे उद्घाटन केले. संबंधित टपरी चालकाचा तर आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या आनंद द्विगुणित झाला होता. बारामतीत अजितदादांच्या या दिलखुलास स्वभावाची आज एकच चर्चा होती (Ajit Pawar had a heartfelt discussion in Baramati today).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी