33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही :  अजित पवार

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही :  अजित पवार

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलावली होती. सदर बैठकीत अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी समन्वयानं काम करा, राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होऊ देऊ नका असे निर्देश यावेळी त्यांनी दिले आहेत. Ajit Pawar take a meeting for a farmers

राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत आहे. याचं पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त ऊसाचं गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचं हार्व्हेस्टर ताब्यात घेऊन ते गळीत हंगाम सुरु असणाऱ्या साखर कारखान्यांना भाडेतत्वावर उपलब्ध देण्याचे निर्देश त्यांनी  दिले आहे.

तसेच हार्व्हेस्टर ताब्यात घेण्यासाठी साखर आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं सूचना द्याव्यात असं ही त्यांनी सांगितले आहे. राज्यातील अतिरिक्त ऊसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही. पुढील वर्षी सुध्दा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पुढील गळीत हंगामाचं सुध्दा योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या या बैठकीत त्यांनी दिल्या आहे.

हे सुध्दा वाचा:

अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडल्यास, मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्यावर चर्चा: अजित पवारांचे भाष्य

Ajit Pawar vs Raj Thackeray On Loudspeakers With ‘Hanuman Chalisa’ At Mosques

पवारांनी केली ईडीची काडी!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी