30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुखांनी भाजपला डिवचले, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या तपासावर केला सवाल

अनिल देशमुखांनी भाजपला डिवचले, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या तपासावर केला सवाल

टीम लय भारी

मुंबई :  सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्राने अचानक सीबीआयकडे दिला. सीबीआयने नक्की काय तपास केला आहे, याबद्दल आम्हालाही उत्कटता आहे, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे ( Anil Deshmukh said, we are waiting for Sushant Singh Rajput’s investigation ).

मुंबई पोलिसांकडून अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तपास केला जात होता. परंतु हा तपास अचानकपणे सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला. सीबीआयला तपासात काय मिळाले याची आम्ही सुद्धा उत्कटतेने वाट पाहात आहोत ( Anil Deshmukh waiting for findings of Sushant Singh Rajput’s case ) .

हे सुद्धा वाचा

Online Class : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या सर्वेक्षणात गुंतलेले शिक्षक ऑनलाइन वर्गाचा अहवाल कधी व कसा देणार?

सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरवर बलात्कार, सुशांतची हत्या : नारायण राणे

SpeakUpForFarmers : बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर डागली तोफ, कायदे रद्द होईपर्यंत केंद्र सरकारविरोधात संघर्ष करणार

सुशांतने आत्महत्या केली आहे, की त्याची हत्या केली आहे याबाबत लोकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे आम्हीही सीबीआयच्या तपासाची वाट पाहात आहोत, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही म्हणून विरोधकांनी गोंधळ घातला होता. बिहार पोलिसांनी तर त्यांच्या कार्यकक्षेत नसतानाही या गुन्ह्याच्या तपासाला सुरूवात केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने तपासाला सुरूवात केली. परंतु १५ दिवस उलटून गेले तरी सीबीआयने या प्रकरणात एफआयआरची नोंद केलेली नाही. त्यामुळे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेमधूनही भाजप व केंद्र सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी कान टोचल्यानंतर सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. प्रोफेशनल पद्धतीने सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी