29 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeसिनेमा'बचपन का प्यार' फेम मुलाची अभिनेत्यांना ही भूरळ; रेकॉर्डिंगसाठी लागली लाईन

‘बचपन का प्यार’ फेम मुलाची अभिनेत्यांना ही भूरळ; रेकॉर्डिंगसाठी लागली लाईन

टीम लय भारी

मुंबई : सध्या भलताच चर्चेत असलेला बसपण का प्यार फेम सहदेव दिरोडाची देशभरात चर्चा आहे. प्रत्येकाच्या तोंडी हे गाणे गुणगुणत आहे. त्यांचे हे कमाल गाणे ऐकून सिने गायकांनी देखील त्याची भेट घेतली आहे. बॉलिवूड रॅपर बादशाह, तसेच इंडियन आयडॉल ह्या सर्वात मोठ्या भारतीय सिंगिंग कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्यात त्याला आमंत्रण आहे (Bachpan ka pyaar fame boy actors are fascinated by this).

जागतिक माध्यमांवर रातोरात स्टार झालेल्या सहदेव दिरडोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याच्या ह्या गाण्याने देशभराला खळखळून हसवले आहे. त्याचीच दखल आता बॉलिवुड रॅपर बादशाहने घेतली आहे. त्याने सहदेवशी बोलून त्याच्या सोबत गाणे रेकॉर्ड करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची ती इच्छा आता पूर्ण होणार अशी बातमी बादशाहने दिली आहे. लवकरच 11 ऑगस्ट रोजी त्याचे हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे पोस्टर स्वतः बादशहाने जागतिक माध्यमांवर टाकले आहे.

इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्नचे नामांकन यादीत ‘यांची’ वर्णी

शिल्पा शेट्टीला दुहेरी चिंता; नवरा तुरुंगात तर नवा चित्रपट अपयशाच्या सावटाखाली

त्याचबरोबर, भारतातील सर्वात मोठा मानला जाणारा, गायकीच्या इंडियन आयडॉल ह्या रिॲलिटी शो मध्ये तो धडक देणार आहे. ह्या कार्यक्रमाचा अंतिम सामना येत्या 15 ऑगस्ट रोजी होणार असून, त्यात पाहुणा म्हणून छोटा सहदेव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या गाण्याने तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणार आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये, इंडियन आयडॉलचे परीक्षक, स्पर्धक आणि सहदेव हे त्याच्या ‘बसपण का प्यार’  ह्या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत (Sahadeva is seen keeping pace with his song Baspan Ka Pyaar).

 

View this post on Instagram

 

A post shared by Indian idol (@indianidols)

आता पर्यंत अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांद्वारे व्हायरल झाले. पण ह्या चिमुकल्याच्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर चांगलचे आपले नाव कोरल आहे. एवढ्या मोठ्या गायकांनी त्याच्या सोबत गाणे करायची इच्छा व्यक्त केली. रिॲलिटी शोच्या अंतिम सामन्यात पाहुणा म्हणून बोलावण्यात आले. छत्तीसगढच्या मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील त्याची भेट घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Indian idol (@indianidols)

PVR थिएटरकडून लस घेतलेल्यांसाठी खुशखबर, मिळणार मोफत मूव्ही तिकीट

Bachpan Ka Pyaar boy performs on Indian Idol 12, Aditya Narayan-Anu Malik and contestants groove to song. Watch

Bachpan ka pyaar fame boy actors are fascinated by this
‘बचपन का प्यार’

कोण आहे हा चिमुकला?

नाव सहदेव दिरोडी, छत्तीसगढ राज्यातील सुकाम जिल्ह्यातील रहाणारा आहे. ‘बचपन का प्यार…’ ह्या गाण्याचे मूळ गायक हे गुजरात चे कमलेश बरोट हे आहेत. पाचवी मध्ये शिकत असताना त्याच्या शिक्षकांनी त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आता तो सातवीत असताना, त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी